फोटो सौजन्य सोशल मिडिया
Tuljabhavani Temple News : तुळजाभवानी मंदिरा मध्ये चक्क पोलिसांनीच मंदिर संस्थांनच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. तुळजाभवानी मंदिराच्या पितळी गेटमधून आत सोडण्यास सुरक्षा रक्षकाने नकार दिल्याने संतप्त झालेल्या पोलिसांनी सुरक्षा रक्षकालाचं बेदम मारहाण केली आहे. या दरम्यान पोलीसचं आरोपी असल्यानं गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप मारहाण झालेल्या सुरक्षा रक्षकाने केला आहे. तुळजापूर मातेचा शारदेय नवरात्र उत्सव सुरू असून भाविकांची मोठी गर्दी पाहण्यास मिळत आहे.
नवरात्रोत्सवामुळे तुळजापूरातील मंदिरात मोठी गर्दी आहे पाहण्यास मिळते, सुरक्षेचे नियम पाळत सुरक्षा रक्षकाने पितळी गेटमधून काही जणांना आत सोडण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून बंदोबस्तावर तैनात असलेल्या 3 ते 4 पोलिसांनी सुरक्षा रक्षकाशी वाद घातला. या मारहाणी मध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने सुरक्षा रक्षकावर हातातील कड्याने हल्ला केला. यामुळे सुरक्षा रक्षकाला गंभीर दुखापत झाली व रक्तस्त्राव झाला आहे.
जखमी सुरक्षा रक्षकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी स्वतःच्याच कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोप सुरक्षा रक्षकाने केला आहे.
तुळजापूरातील मंदिरात सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यात आली, पोलिसांनी मारहाण केल्यामुळे सुरक्षारक्षकाने पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी धाव घेतली. पण आरोपी पोलीस कर्मचारी असल्याने स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात विरोधीत गुन्हा दाखल घेत नाही आहेत. पोलीस कर्मचारी टाळाटाळ करत असून आपल्यावर अन्याय झाला आहे. मंदिर परिसरातील पुरावा म्हणून मारहाणीचा व्हिडिओ उपलब्ध असून देखील पोलीस गुन्हा नोंदवून घेत नाही आहेत. अशी खंत सुरक्षा रक्षकाने केली आहे.






