औषधाच्या किमतीमागे मार्जिनची साखळी कार्यरत! सीसीआयच्या अभ्यासातून उलगडा; उत्पादकापासून मेडिकलच्या काउंटरपर्यंत टप्पे
Mumbai News: औषध दुकानांच्या काउंटरवर औषधांच्या पाकिटावरील एमआरपी पाहून रुग्ण पैसे मोजतो. मात्र या अंतिम किमतीमागे केवळ औषधनिर्मितीचा खर्च नसतो. उत्पादकापासून स्टॉकिस्ट, घाऊक विक्रेता आणि किरकोळ विक्रेत्यापर्यंतच्या वितरण साखळीतील विविध टप्प्यांवरील व्यापार मार्जिनचाही औषधाच्या अंतिम किमतीवर परिणाम होतो. सीसीआय म्हणजेच भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या औषध क्षेत्रावरील अभ्यासातून ही किंमत-साखळी स्पष्ट होते. मात्र औषध कंपन्यांच्या माहितीनुसार हे मार्जिन शेवटच्या टप्प्या पर्यंत टिकत नसून हे मार्जिन वाढतेच, असेही स्पष्ट होत असून त्यामुळे प्रत्यक्ष औषध दरात वाढ दिसून येते.(फोटो सौजन्य – istock)
सीसीआयच्या ‘मार्केट स्टडी ऑन द फार्मासिटिकल सेक्टर इन इंडिया’ या अभ्यासात उत्पादकाची किंमत, वितरणातील मार्जिन, घाऊक व किरकोळ मार्जिन आणि कर अशा विविध ‘प्राइस पॉईंट्स’चा अभ्यास करण्यात आला. त्यामुळे पाकिटावरील औषधाची किंमत म्हणजे थेट उत्पादन खर्च नव्हे, हे स्पष्ट होत आहे.
औषधांच्या व्यापारातील साखळी साधारणपणे कंपनी ते स्टॉकिस्ट ते रिटेलर ते रुग्ण अशी असते, कंपनीकडून स्टॉकिस्टला मिळणारी किंमत, तर स्टॉकिस्टकडून किरकोळ विक्रेत्याला मिळणारी किंमत म्हणून ओळखली जाते. त्यानंतर ग्राहकासाठी एमआरपी निश्चित केली जाते. सीसीआयच्या अभ्यासानुसार, औषध किंमत नियंत्रण आदेशच्या कक्षेतील शेड्युल औषधांसाठी वैधानिक व्यापार मार्जिन २४% असून त्यात किरकोळ विक्रेत्याचा १६ टक्के आणि घाऊक विक्रेत्याचा ८ टक्के हिस्सा आहे. नॉन-शेड्युल औषधांसाठी मर्यादा नसल्याने घाऊक पातळीवर १०% आणि किरकोळ पातळीवर २०% मार्जिनची रचना वापरतात.
नियम मोडला की दणका बसणारच! FDA ने Zepto अन् ब्रीजवासीला दाखवले दिवसा तारे, थेट लायसन्स रद्द
८८ काही कंपन्या एमआरपी ठरवताना उत्पादन खर्चाबरोबरच वीजबिल, कर्मचारी वेतन आणि इतर व्यवस्थापकीय खर्चाचाही विचार करतात, उत्पादक, स्टॉकिस्ट, वितरक आणि किरकोळ विक्रेता अशा विविध स्तरांवर मार्जिन असते. ग्राहक मेडिकलमध्ये सवलत मागतो; मात्र ही सवलत नेमकी कोणाच्या मार्जिनमधून दिली जाते, हा महत्वाचा प्रश्न आहे, अशी माहिती एस. चंद्रशेखर, राष्ट्रीय विक्री विभाग, अर्जेनिक्स हेल्थ केअर प्रा. लि.यांनी दिली आहे.






