Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray : शिक्षण, हमीभाव, अन्नधान्य अन्…, कोल्हापुरातील सभेत उद्धव ठाकरेंनी दिली ५ मोठी आश्वासनं

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचाराला आज कोल्हापुरातील राधानगरी मतदारसंघातून झाली. या प्रचारसभेत ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि महायुतीवर जोरदार हल्ला चढवताना जनतेला पाच मोठी आश्वासनंही दिली आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 05, 2024 | 04:43 PM
कोल्हापुरातील सभेत उद्धव ठाकरेंनी दिली ५ मोठी आश्वासनं

कोल्हापुरातील सभेत उद्धव ठाकरेंनी दिली ५ मोठी आश्वासनं

Follow Us
Close
Follow Us:

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचाराला आज कोल्हापुरातील राधानगरी मतदारसंघातून झाली. या प्रचारसभेत ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि महायुतीवर जोरदार हल्ला चढवताना जनतेला आश्वासनंही दिली. महायुती सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. कोरोना काळात महाराष्ट्राला देशात नंबर वनचं राज्य बनवलं होतं, याचीही त्यांनी आठवण करून देताना, तरीही सरकार पाडल्याची खंत बोलून दाखवली.

ठाकरेंनी कोणती आश्वासनं दिली?

मुलांनाही मोफत शिक्षण
राज्यातील केवळ मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं. मुलगा आणि मुलगी दोघेही कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुलांनाही मोफत शिक्षण दिलं जाणार आहे.

हेही वाचा-पुतळे नाही तर प्रत्येक जिल्ह्यात मंदिरं उभारणार; सिंधुदुर्गातील त्या घटनेवरून उद्धव ठाकरेंची कोल्हापुरात तुफान फटकेबाजी

महिला अधिकारी असलेलं पोलीस ठाणे
सध्या महिलांना पोलीस ठाण्यात गेल्यावर कुठे तक्रार करायची, हे अनेकदा लक्षात येत नाही. त्यामुळे महिला पोलिसांची भरती केली जाईल. पोलीस ते वरिष्ठ पदांवर महिला अधिकारी असलेली पोलीस ठाणी उभारण्यात येतील

शेतमालाला हमीभाव
राज्यातील शेतकऱ्यांना हमीभाव दिला जाईल. महाविकास आघाडीचं सरकार पडलं नसतं तर यंदाच्या वर्षी शेतकरी कर्जमुक्त झाला असता, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

भूमीपुत्रांना परवणाऱ्या दरात घरे

मुंबईतील धारावीतील जागा अदाणी ग्रुपला देण्यात येत आहे. अदानी ग्रुपचा प्रकल्प रद्द करुन धारावीकरांना उद्योगधंद्यासकट घरे दिली जातील. मराठी माणसाने रक्त सांडून मुंबई मिळवली आहे. ग्रामीण भागातील जनतेने मुंबईत यावे. मुंबई तुमची आहे, मराठी माणसाची आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांना केलं. त्यामुळे मुंबईवर तुमचा हक्क आहे. धारावी आणि मुंबई परिसरात महाराष्ट्रातील भूमीपुत्रांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करुन घेऊ, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

हेही वाचा-पुरंदरमध्ये होणार तिरंगी लढत; शिवतारेंना शह देण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठबळ?

जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थीर ठेवणार
महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर होते. आता पुन्हा सत्ता आली की महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात कोणतेही बदल होणार नाहीत. डाळ, तांदूळ, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

भूमीपुत्रांच्या हक्काचं ओऱबाडून गुजरातला पळवलं

महाविकास आघाडीच्या सरकारच्या कोरोनाचं संकट आलं. तरीही महाराष्ट्राला देशात नंबर वनचं राज्य बनवलं. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, महाविकास आघाडीचं सरकार पाडलं नसतं तर आज शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त झाला असता. राज्यात परकीय गुंतवणूक वाढली. मात्र या सरकारने सर्व उद्योग गुजरातला पळवले. गुजराती मराठी असा दुजाभाव नाही. पण इथल्या भूमीपुत्रांच्या हक्काचं ओरबाडून दुसऱ्या राज्यात पळवणं हा कोणता न्याय, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Web Title: Uddhav thackeray 5 big promises in kolhapur radhanagari constituency maharashtra assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 04:16 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
1

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.