Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्धव ठाकरे थेट अजित पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण, भेटीनंतर काय म्हणाले ठाकरे, पाहा यावरील सविस्तर रिपोर्ट

महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून मोठी उलथा-पालथ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला एक वेगळेच वळण लागले. अजित पवार थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने हा आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तरीही शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेनेचे वाक् युद्ध आणि आरोप-प्रत्यारोप उभ्या महाराष्ट्राने पाहिले. त्यानंतर आता अजित पवार गेल्यानंतर भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे फुटीर गट मिळाले आहेत. यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात चर्चांणा उधाण आले आहे. नेमके उद्धव ठाकरे काय म्हणाले, पाहा यावरील सविस्तर रिपोर्ट........

  • By युवराज भगत
Updated On: Jul 19, 2023 | 03:25 PM
उद्धव ठाकरे थेट अजित पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण, भेटीनंतर काय म्हणाले ठाकरे, पाहा यावरील सविस्तर रिपोर्ट
Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठे उठाव म्हणून शिवसेनेचे बंड आणि आता अजित पवारांचे राष्ट्रवादीतील बंड होय. अजित पवारांनी बंड करीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. अजित पवारांनी शिंदे-फडणीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अजित पवारांना भेटले.

उद्धव ठाकेर थेट अजित पवारांच्या दालनात
विरोधकांचा चेहरा असलेले उद्धव ठाकरे हे थेट अजित पवारांच्या दालनात जाऊन भेटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. दरम्यान ठाकरे गटाच्या आमदारांसोबत घेतलेल्या या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दल खुद्द उद्धव ठाकरेंनी खुलासा केला आहे.

भेटीनंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे म्हणाले की, काल आणि परवा बंगळुरु येथे देशप्रेमी पक्षांची बैठक पार पडली. जी लोकशाही प्रेमी पक्षांची आघाडी स्थापन झाली आहे. ही लढाई व्यक्ती किंवा पक्षाविरोधात नसून हुकूमशाही विरोधात आहे. पण, जो पायंडा पडतो आहे ते देशासाठी घातक आहे, त्यासाठी सर्व लोकशाहीप्रेमी पक्ष एकत्र येत आघाडी मजबूत निर्माण झाली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

नेमकी चर्चा काय झाली पाहा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी याबद्दल माहिती दिली. उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांने राज्यासाठी चांगले काम करावे, असे सांगितले. येथे सत्तेसाठी मोठ्या विचित्र घडामोडी आणि घाणेरडे राजकारण चालू असताना, त्यामध्ये राज्याचे तसेच मूळ शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

अजित पवारांसोबत अडीच वर्ष केले काम
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवारांनी अडीच वर्ष माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या स्वभावाची मला कल्पना आहे. इथे बाकीच्यांचे सत्तेसाठी काहीही डावपेच चालले असले तरी त्यांच्याकडून जनतेला योग्य मदत मिळेल. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या परत एकदा त्यांच्याकडे दिल्या गेल्या आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Web Title: Uddhav thackeray meet ajit pawar see detailed report on maharashtra political discussions what thackeray said after meeting nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2023 | 03:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.