Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवरायांच्या पुतळ्याच्या शिल्पकाराचे ठाण्याशी कनेक्शन काय?; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

शिवरायांच्या काळात एका पाटलाने एका मुलींवर अत्याचार केले ही गोष्ट जेव्हा महाराजांचा कळाली त्यावेळी त्यांनी त्या पाटलाचे हात कलम टाकले. एका भगिणीला त्रास दिला तर त्यांनी इतका सक्त निर्णय घेतला. त्यावरून महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात त्यांची निती काय होती हे दिसून येते.असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 28, 2024 | 03:33 PM
विधानसभा निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का

विधानसभा निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: लोकसभेपुर्वी नौदलदिनानिमित्त शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला. पण ज्या घिसाडघाईने हा पुतळा उभरण्यात आला ते पाहता आता सगळ्या गोष्टी उघड होत आहेत. पुतळा उभारणारा तो शिल्पकार कोण होता. त्याचे ठाण्याशी काय कनेक्शन होतं. यातली काही माहिती समोर येत आहे.  ते पाहता या स्मारकाच्या कामातही कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे.” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याने राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. अशातच या पुतळा उभारणीत   मोठा भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावरून महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि नाना पटोले यांनी सत्ताधारी महायुतीवर ताशेरे ओढले आहेत.

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावरही निशाणा साधला आहे. दिपक केसरकर म्हणत आहेत की वाईटातून काही चांगलं घडणार म्हणजे पुन्हा एकदा पुतळा उभारण्याचा घाट घालणार, टेंडर काढणार, त्यातही घोटाळा करणार आणि जिथे मिळेल तिथे खाणार,यांच्या या  कारभाराची आता किळस येऊ लागली आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

हेदेखील वाचा:  शिवरायांच्या पुतळा निर्मिती भ्रष्टाचाराचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी वापरले; वैभव नाईकांचे गंभीर आरोप

तसेच, यांच्या भ्रष्टाचाराना कळस गाठला आहे आणि कारभारांनी किळस आणली आहे. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंद रद्द करण्यात आला. शिवरायांचा पुतळा पडला त्यासाठी  महाविकास आघाडीने मोर्चा काढण्यात आला, त्यात काही मोदी दलाल आणि शिवद्रोेही रस्ता अडवून बसलेे हे सर्व शिवद्रोही आहेत.  महाराजांचा पुतळा वाऱ्यांने कोसळला असे सांगितले जाते. पण माजी राज्यपाल भगतसिंह कोश्याीरी समुद्र किनारीच राहात होते. त्यांची टोपी कधी वाऱ्याने पडली नाही तर मग पुतळा कसा पडला.

राजकोट किल्ल्यावर जो राडा झाला. पण भाजपचे सर्वच कार्यकर्ते असे नाहीत, त्यातही  जे शिवद्रोही आहेत. ते तिथे आडवे आले आहेत. हे शिवद्रोही  कोण आहेत ते चॅनेल वर आले आहेत. हे आता इतके मस्तवाल झालेत की त्यांनी भीडभाड सोडून दिलीये आणि त्यांचे पाठीराखे तिकडे दिल्लीत बसलेत.

हेदेखील वाचा: भारताच्या सर्वात शक्तिशाली NSG कमांडोनाच ‘ब्लॅक कॅट कमांडो’ म्हणतात का? जाणून घ्या 

शरद पवार काय म्हणाले…

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा म्हणाले, “वाऱ्याच्या वेगामुळे शिवरायांचा पुतळा कोसळल्याचे काहीजण म्हणत आहेत, पण ज्या ठिकाणी स्वत: पंत प्रधान जाऊन आले, त्यांच्या ह्स्ते या पुतळ्याचे अनावरण झाले, त्याठिकाणी भ्रष्टाचार किती टोकाला पोहचला आहे. कुठे भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये याचे तारतम्यही या सरकारला राहिलेले नाही.”

“पुतळ्याच्या देखरेखीची संपूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारची होती. राज्यात कुठेही पुतळा उभारायचा  असेल तर राज्य सरकारची परवानगी बंधनकारक असते.  पंतप्रधान तिथे स्वत: गेले होते. पुतळ्याच्या मुद्द्यावरून विरोधक राजकारण करत आहेत. अशी टीका फडवणीसांनी केली आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले,  शिवरायांच्या काळात एका पाटलाने एका मुलींवर अत्याचार केले ही गोष्ट जेव्हा महाराजांचा कळाली त्यावेळी त्यांनी त्या पाटलाचे हात कलम टाकले. एका भगिणीला त्रास दिला तर त्यांनी इतका सक्त निर्णय घेतला. त्यावरून महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात त्यांची निती काय होती हे दिसून येते.असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा:  1 सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मारकासमोर सरकारविरोधात जोडो मारो आंदोलन करणार, शिवप्रेमींनी आंदोलनात सहभागी व्हावं – उद्धव ठाकरे

तुम्ही जे पाप केलंय ते का लपवत आहात- नाना पटोलेंचा

जर नरेंद्र मोदी,  राजनाथ सिंह त्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी तिथे गेले होते. पण त्याची सर्व प्रोसेजर पूर्ण करण्यात आली नाही. सांस्कृतिक संचलनालयाकडून त्या संबंधित प्रतिमेच्या गुणवत्तेची पूर्ण पडताळणी केल्याशिवाय पंतप्रदानांनी तिथे जाणे योग्य नव्हते, पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यासाठी घाई कऱण्यात आली. कालची जी घटना घडली मुख्यंमत्री म्हणतात मी याच्यापेक्षा मोठा पुतळा उभारेल पण तुम्ही जे पाप केलंय ते का लपवत आहात, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. तसेच, महाराष्ट्रात रस्त्यासाठी तुम्ही जितके पैसे खर्च केलेत पण आज रस्त्यात खड्डे नाही, खड्ड्यामध्ये रस्ते आहेत. लोक कोर्टात जात आहेत. पण या कमीशन खोर सरकारला कधी अक्कल येणार, असा टोलाही नाना पटोलेंनी लगावला आहे.

Web Title: Uddhav thackerays direct question is what is the connection of shiva rayas statue sculptor with thane nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 03:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.