औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thckeray) आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद दाखल होताच त्यांनी आज दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट दिली.सर्वप्रथम त्यांनी गंगापूरच्या दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती यावेळी जाणून घेतली. तसेच शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.
[read_also content=”पाकिस्तानच्या दोन्ही विस्फोटक फलंदाजांची विकेट https://www.navarashtra.com/sports/pakistan-wickets-for-both-pakistan-batsmen-338659.html”]
गेल्या काही दिवसापासुन झालेल्या पावसानं झालेल्या संपुर्ण राज्यात कहर केला आहे. मराठवाडा ते विदर्भ सगळीकडे पावसानं थैमान घातलं असुन अनेक भागात शेतीपीकांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अशातच राज्यात घडलेल्या सत्तातंर नाट्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच मराठवाडा दौरा असुन या दौऱ्यादरम्यान, ओल्या दुष्काळाचा फटका बसलेल्या गावांना भेट देत आहेत. यावेळी त्यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या भागात भेट देऊन त्यांनी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. सोबतच आम्ही सर्व तुमच्या सोबत असल्याचा शेतकऱ्यांना धीर दिला.
[read_also content=”भारत पाकिस्तान सामन्याआधीच मैदानावर प्रेक्षकांची गर्दी; ‘हे’ आहे कारण https://www.navarashtra.com/sports/crowd-of-spectators-on-the-field-before-the-india-pakistan-match-this-is-because-338564.html”]