इंदापूर, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: उजनी धरणातील पाण्याची पातळी वेगाने घटत असल्याने पाणलोट क्षेत्रातील पिके जगवण्यासाठी व पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होवू नये म्हणून पावसाळ्यापर्यंत उजनीचे पाणी आरक्षित करावे अशी मागणी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी केली आहे.
ते म्हणाले की, रविवारी( दि.०४) उजनी धरणातील एकूण पाण्याची पातळी ४८९ .६२० मीटर होती.एकूण पाणीसाठा १५४२.२६ घन मीटर म्हणजेच ५४.४६ टीएमसी होता.उपयुक्त जलसाठा वजा २६०.५५ घनमीटर म्हणजे वजा ९.२० टीएमसी होता. टक्केवारी वजा १७.१७ अशी नोंदवली गेली. उजनी धरणातून सोलापूरसाठी पाणी सोडल्याने पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. गेल्या २० दिवसात २४ टीएमसी पाणी घटल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.