भारतातील 74 टक्के Gen Z यूजर्स मोबाईलवर गेम खेळण्यासाठी घालवतात तब्बल इतके तास, Free Fire-BGMI आहे टॉप चॉइस
स्मार्टफोनवर गेम खेळणं, रिल्स बघणं, फोटो क्लिक करणं, चॅटिंग, कॉलिंग हे अनेकांचं डेली रुटीन बनलं आहे. यातीलही अनेकजण असे असतात विशेषत: मोबाईलचा वापर करणारी तरूण पिढी स्मार्टफोनवर गेम खेळण्यासाठी त्यांचे अनेक तास वाया घालवते. स्मार्टफोनवर गेम खेळणं हा त्यांच्या जिवनाचा भाग बनला आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार Gen Z मुलं मोबाईल गेम खेळण्यासाठी अनेक तास वाया घालवतात.
इबरमीडिया रिसर्च (CMR) च्या नव्या अहवालानुसार, 32 टक्क्यांहून अधिक भारतीय मोबाईल युजर्स विशेषत: Gen Z मुलं मोबाईलवर गेम खेळण्यासाठी तब्बल 4 ते 6 तास वाया घालवतात. 74 टक्के Gen Z यूजर्स कमीतकमती 6 तास गेम खेळतात. सर्वेमध्ये CMR ने भारताची टियर 1, टियर 2 आणि टियर 3 शहरं जसं की – दिल्ली, मुंबई, बंगळुरु, गुवाहाटी, चेन्नई, हैद्राबाद, जयपुर, अहमदाबाद, इंदौर आणि ग्वालियरमध्ये 1,550 युजर्ससोबत संवाद साधला. यावेळी त्यांच्या लक्षात आले की भारतातील अनेक मोबाईल युजर्स त्यांचा वेळ मोबाईलवर गेम खेळण्यासाठी वाया घालवतात. हा सर्वात मोठा चिंतेचा विषय असल्याचं सांगितलं जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अशी माहिती समोर आली आहे की,भारतीय सरकार ऑनलाइन गेम्स, रियल-मनी गेम्ससाठी टाइम लिमिट आणि ऑनलाइन खर्चांवर निर्बंध घालण्याचा विचार करत आहे. सर्वेमध्ये आढळलं आहे की, 72 टक्के स्मार्टफोन यूजर्स एंटरटेनमेंटसाठी गेम्स खेळतात. तर 52 टक्के मेंटल एजिलिटी आणि 41 टक्के सोशलाइजिंगसाठी गेमिंग करतात.
26 टक्के गेमर्स Free Fire खेळतात तर 26 टक्के गेमर्स BGMI ला प्राधान्य देतात. सर्वेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 19 टक्के युजर्स पजल्स आणि 19 टक्के First-Person Shooter (FPS) खेळतात. यानंतर अॅक्शन-एडवेंचर गेम्सचा नंबर येतो. सर्वेक्षणात असेही नमूद केले आहे की भारतातील 30 टक्क्यांपेक्षा जास्त जनरल झेड गेमर्स प्रीमियम टायटल पसंत करतात आणि त्यांना उच्च दर्जाचा गेमिंग अनुभव हवा असतो. स्पर्धात्मक गेमिंग देखील लोकप्रिय होत आहे, 57 टक्के जनरेशन झेड ईस्पोर्ट्समध्ये सहभागी आहेत.
साइबरमीडिया रिसर्चचे सीनियर एनालिस्ट सुगंधा श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे की, ‘ मुलांच्या सतत मोबाईलवर गेम खेळण्यामुळे त्यांच्यात होणारे बदल आपण अगदी सहज पाहू शकतो. या बदलांमध्ये कॅजुअल प्ले ते अधिक इमर्सिव, सोशली कनेक्टेड आणि कॉम्पिटिटिव फॉर्मेट्सपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. Gen Z या सर्वाचे नेतृत्व करत आहेत. प्रीमियम गेमप्ले, सोशल डिस्कवरी आणि eSports पार्टिसिपेशन आता मोबाइल गेमिंगच्या पुढील लाटेची व्याख्या बनत आहे.