मुंबई : अमरावती (Amravati) येथील व्यावसायिक उमेश कोल्हेची हत्या (Businessman Umesh Kolhe Murder Case) केल्याप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए न्यायालयाने (NIA Court) १२ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी (NIA Custody) सुनवाली.
नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर (Social Media) संदेश प्रसारित केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश कोल्हे हे दुकान बंद करून मोटरसायकलने घरी जात असताना रात्री १०.३० च्या सुमारास चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली.
[read_also content=”टीसीआयला जून तिमाहीत ७७ कोटी निव्वळ नफा https://www.navarashtra.com/business/77-crore-net-profit-for-tci-in-june-quarter-see-the-details-here-nrvb-312467.html”]
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आल्यानंतर सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यातच बुधवारी एनआयएकडून मुसफिक अहमद आणि अब्दुल अरबाज या दोघांना अटक केली होती. त्या दोघांना शुक्रवारी एनआयए न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
अटक कऱण्यात आलेल्या दोघांपैकी मुशफीक अहमद हा मौलवी असून दुसरा अब्दुल अरबाज हा एका सेवाभावी संस्थेत रुग्णवाहिनीचा चालक आहे. या दोघांनीही कोल्हे हत्याकांडचा मास्टरमाइंड इरफान खान आणि इतर आरोपींना हत्येनंतर लपवण्यास मदत केली होती.
[read_also content=”कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा; राज्यात प्रौढ लाभार्थींचे प्रमाण सर्वाधिक https://www.navarashtra.com/maharashtra/first-dose-of-corona-vaccine-has-the-highest-number-of-adult-beneficiaries-in-the-maharashtra-state-nrvb-312441.html”]
तसेच कोल्हेंच्या हत्येनंतर या दोघांनीही आनंद साजरा केला आणि त्या अनुषंगाने एक डिनर पार्टीचे आयोजन केले. मात्र, ही पार्टी कुठे झाली त्यात कोण शामिल होते सर्व बाबींच्या सखोल चौकशीसाठी आरोपींची कोठडी देण्याची मागणी एनआयएकडून करण्यात आली. त्याची दखल घेत न्यायालयाने दोन्ही आरोपींना १२ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली.