union minister anurag thakur is confused by the situation of kdmc roads and cleanliness nrvb
कल्याण : KDMC तील रस्ते (Roads) आणि स्वच्छतेची अवस्था (Cleanliness Condition) पाहून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर संभ्रमित झाले (Union Minister Anurag Thakur was confused) असून हीच का स्मार्ट सिटी (Smart City) असे विचारत आयुक्तांना (Commissioner) खडे बोल सुनावले.
कल्याण डोबिवली महानगर पालिकेत (KDMC) केंद्र व राज्य शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून स्मार्ट सिटीचे प्रकल्प सुरू असून दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातील (Kalyan Lok Sabha Constituency) कल्याण डोंबिवली शहरात दौरा केला असता त्यांना डोंबिवलीतील खराब रस्त्याचा अनुभव आल्याने अखेरीस पुढील प्रवास बोटीने करण्याची नामुष्की ओढवली होती.
त्यातच शहरातील अस्वछतेचे दर्शन झाल्याने पालिकेतील विविध प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी पालिका मुख्यालयात आलेल्या केंद्रीय मंत्र्यांनी केडीएमसीतील रस्त्याची दुरावस्था आणि स्वच्छतेची अवस्था पाहून केंद्रीय मंत्री संभ्रमित झाले. त्यांनी हीच का स्मार्ट सिटी असे खडे बोल पालिका आयुक्तांना सुनावले.
[read_also content=”Big News : उच्च न्यायालयाची तंबी; आता बॅनरबाजीला आलेला ऊत थांबणार, ‘ही’ गोष्ट करावीच लागणार अन्यथा… https://www.navarashtra.com/maharashtra/unauthorised-hordings-case-mumbai-high-court-hint-to-issue-compulsory-qr-codes-for-banners-nrvb-325200.html”]
स्मार्ट सिटी प्रकल्प राबविताना कल्याण डबिवली महानगर पालिकेला केंद्र शासनाकडून मिळालेल्या पुरस्कारा बाबत नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला आहे.
संध्याकाळी अनुराग ठाकूर हे केडीएमसीच्या कार्यालयात आले असता केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे (Dr. Bhausaheb Dangde) हे केंद्रीय मंत्री ठाकूर, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, संजय केळकर हे स्मार्ट सिटी कंट्रोल रुममध्ये पोहचले. या दरम्यान केंद्रीय मंत्री ठाकूर यांना स्मार्ट सिटी प्रकल्पांची चित्रफित दाखविली जात होती. त्याच वेळी मंत्री ठाकूर यांनी खडे बोल सुनावले आहे.
मला जेव्हा माहित पडले ही कल्याण डोंबिवली हे स्मार्ट सिटीमध्ये आहे हे एकून मला आश्चर्य वाटले. अन्य स्मार्ट सिटी शहरात स्वच्छता, चांगले रस्ते, हॉर्टी कल्चर, वृक्षारोपण यावर भर दिला आहे. असे विधान मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी केले आहे.