Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशभरातील यूथच्या आरोग्यासाठी पुण्यात ‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ची अनोखी स्पर्धा सुरू

देशभरातील तरुणांच्या फिटनेससाठी आदर्श सोमानी यांनी एक आदर्श उपक्रम सुरू केला आहे. सध्या या स्पर्धेचे केंद्र पुण्यातील बालेवाडी हेच असणार आहे. ही स्पर्धा १५ एप्रिल ते १९ एप्रिलदरम्यान होणार आहे. तसेच विजेत्यांना मिळणार एक कोटीहून अधिक रुपयांची बक्षिसे मिळणार आहेत. या स्पर्धेत विशेष गोष्ट म्हणजे मुला-मुलींना समान बक्षीस मिळणार आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Apr 15, 2023 | 08:57 PM
देशभरातील यूथच्या आरोग्यासाठी पुण्यात ‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ची अनोखी स्पर्धा सुरू
Follow Us
Close
Follow Us:
पुणे : ‘बलसागर भारत होवो’ या सानेगुरूजी यांच्या कवितेला साजेसा अभिनव उपक्रम आदर्श सोमानी या संकल्पनेतून साकारत आहे. ‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी देशभरात एक चळवळ सुरू केली असून, दि. १५ ते १९ एप्रिल २०२३ दरम्यान पुण्यामध्ये बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा उपक्रम होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना एक कोटी १५ लाख रूपयांची पारितोषिके देऊन गौेरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागासाठी हे नियम :
‘पुश इंडिया पुश’ या स्पर्धेत १८ वर्षांपुढील नागरिकांनाच सहभागी होता येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. मात्र ऑनलाईन नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. माजी लष्कर प्रमुख आणि केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंग हे या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ‘पुश इंडिया पुश’चे संस्थापक आदर्श सोमानी, मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया, एएफएमसीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल कोतवाल, मुंबई पोलीस महासचालक कृष्णप्रकाश, महाराष्ट्राचे राज्य क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, स.प. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक रणजीत चामले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया यांनी केले.
जय हिन्द 🇮🇳 pic.twitter.com/DV6KGcUQzi — Major Surendra Poonia (@MajorPoonia) August 3, 2022
या दिग्गज बॉलिवूड कलाकारांनी केला प्रचार :
सारा अली खान, लारा दत्ता, एनएसजी कमांडो भूषण वर्तक, डॉ. धनंजय मोरे, सुहास खामकर, मनीष अडविलकर आणि अमृता रायचंद अशा स्टार बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर ‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ स्पर्धेचा प्रचार केला आहे. ‘पुश अप चॅलेंज’ हा देशवासियांच्या सुदृढ स्वास्थासाठी, शारीरिक ताकद, लवचिकता आणि कठिण प्रसंगांला सामोरे जाण्याचे बळ मिळण्यासाठीचा एक उप्रकम होय.
आदर्श सोमानी यांचा वडिलांच्या स्मरणार्थ उपक्रम :
‘पुश इंडिया पुश’ उपक्रमाचे संस्थापक आदर्श सोमानी यांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ या स्पर्धेला प्रारंभ केला आहे. ‘पुश अप’ हा व्यायाम प्रकाराचा प्रसार व्हावा, त्याचे महत्त्व वाढावे आणि बलसागर भारतचे स्वप्न काही प्रमाणात पूर्ण होण्यासाठी आम्ही हा खारीचा वाटा उचलत आहोत. ‘पुश अप’ हा भारतीय जीवनशैलीचा भाग व्हावा, यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे, असे आदर्श सोमानी यांनी सांगितले.
देशभरातून १७ हजार नारिकांचा सहभाग :
‘पुश इंडिया पुश चॅलेंज’ या स्पर्धेसाठी देशभरातील १७ हजार नागरिकांनी सहभाग निश्चित केला आहे. इच्छुक स्पर्धक अजूनही  या वेबसाईटवरून नावनोंदणी करून स्पर्धेत सहभागी होऊ शकता. दररोज स्पर्धास्थळी देखील नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. देशातील २९ राज्यांतील पुरूष आणि महिलांसाठी स्पर्धेत सहभागी होण्याची सारखीच संधी असेल. पुरुष आणि महिला गटातील प्रत्येकी पहिल्या दहा विजेत्या खेळाडूंवर भरघोस बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. याशिवाय प्रत्येक सहभागी नागरिकाला प्रमाणपत्र मिळणार आहे.

Web Title: Unique competition of push india push challenge will be held in pune for youth across the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2023 | 05:01 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.