Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका; सर्व पीके पाण्याखाली, आता सरकारच्या मदतीकडे डोळा

पंढरपूर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये द्राक्ष छाटणीला जोर धरला होता. तयार झालेले पीक शेतातून सुरक्षित घरी आणण्यासाठी शेतकरी रात्रदिवस मेहनत घेत असताना अचानक कोसळलेल्या या अवकाळी पावसाने त्यांच्या कष्टावर पाणी फिरले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 29, 2025 | 01:25 PM
अवकाळीने पंढरपूरातील शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे

अवकाळीने पंढरपूरातील शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : ऐन द्राक्ष छाटणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पंढरपुरात विशेषतः पंढरपूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजावर अस्मानी संकट उभे ठाकले आहे. हातातोंडाशी आलेले पीके वाया जाण्याची भीती असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पंढरपूर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये द्राक्ष छाटणीला जोर धरला होता. तयार झालेले पीक शेतातून सुरक्षित घरी आणण्यासाठी शेतकरी रात्रदिवस मेहनत घेत असताना अचानक कोसळलेल्या या अवकाळी पावसाने त्यांच्या कष्टावर पाणी फिरवण्याची वेळ आली आहे. उभे पीकेही पावसामुळे नुकसानग्रस्त होण्याची शक्यता असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पंढरपूरातील शेतकरी अनेक नैसर्गिक संकटांवर मात करत शेती करत आला आहे. मात्र, द्राक्ष छाटणीच्या हंगामातील हा पाऊस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणारा ठरण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्ष पीक नुकसानीची शासनाने तातडीने दखल घ्यावी, पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. या अस्मानी संकटात शासनाकडून नेमकी काय मदत मिळणार, याकडे पंढरपुरातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

शेतकरी हतबल

गेले दोन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष व भुसार पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. द्राक्ष पिकाला मोठ्या प्रमाणात पावसाचा तडाखा बसला आहे. द्राक्ष छाटणीला सुरू असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पंढरपूर तालुक्यासह द्राक्षपीक धोक्यात आले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाले असून, सततच्या पावसाने या मका, बाजरी पिकाला कोब येऊन, नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतातील पिके पावसात भिजून नुकसान झाले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांदेखत नुकसान होत असल्याचे पाहताना शेतकरी हतबल होत आहेत.

पावसाने केलं होत्याचं नव्हतं

तालुकाभरात गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी सकाळपासून पावसाने सुरुवात केली होती. या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकाला बसला आहे. द्राक्ष पीक छाटणी योग्य बनले असून, बहुतांशी ठिकाणी छाटणी जोरात सुरू आहे. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष शेतीचे नुकसान झाले आहे. कासेगाव, करकंब, तनाळी, शेटफळ, खर्डी, शिरगाव, अनवली, गादेगाव, भाळवणी, पिराचीकुरोली, पुळूज आदी पंचक्रोशीत तसेच अन्य भागात उभे द्राक्षपिक जमीनदोस्त झाले आहे.

हवामान बदलाचा पिकांवर परिणाम

यंदाच्या हंगामात हवामान बदलामुळे आणि अतिवृष्टीमुळे द्राक्ष शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच, हंगामपूर्व झालेल्या पावसामुळे पेरु आणि डाळींबाचेही मोठे नुकसान झाले आहे. या हवामान बदलामुळे भविष्यात द्राक्ष, जांभूळ, आंबा यांसारख्या फळझाडांचेही नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन करण्याची आणि झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची नितांत गरज आहे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Web Title: Unseasonal rains hit farmers all crops under water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 01:25 PM

Topics:  

  • Farmers Issues
  • Pandharpur News

संबंधित बातम्या

Farmers News: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचं निघालं दिवाळं; परतीच्या पावसाने पिकांचा बळी अन् आश्वासनं राहिली वाऱ्यावर
1

Farmers News: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचं निघालं दिवाळं; परतीच्या पावसाने पिकांचा बळी अन् आश्वासनं राहिली वाऱ्यावर

पंढरपुरात दिवाळी सुट्ट्यांमुळे भाविकांची तूफान गर्दी; वाहतूक कोंडीसह खड्ड्यांमुळे लोक त्रस्त
2

पंढरपुरात दिवाळी सुट्ट्यांमुळे भाविकांची तूफान गर्दी; वाहतूक कोंडीसह खड्ड्यांमुळे लोक त्रस्त

निवडणूक आयोगाच्या निर्णयाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु
3

निवडणूक आयोगाच्या निर्णयाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.