Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वल्लभेश मंगलम् विवाह सोहळा संपन्न! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात उत्साहपूर्ण वातावरण

तुळशीविवाह प्रमाणे वल्लभेश विवाह सोहळा देखील तितकाच महत्त्वाचा मानला जातो. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये हा सोहळा पार पडला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 31, 2025 | 06:39 PM
Vallabhesh Mangalam vivah at Dagdusheth Halwai Ganapati mandir Pune News

Vallabhesh Mangalam vivah at Dagdusheth Halwai Ganapati mandir Pune News

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुणेकरांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये मोठी गर्दी केली होती. त्यानंतर आता मंदिरामध्ये वल्लभेश मंगलम् विवाह सोहळा संपन्न झाला आहे. मंदिरामध्ये शुभमंगल सावधानचे मंगल सूर…श्री वल्लभेश महाराज की जय चा जयघोष… अक्षता व फुलांची उधळण आणि ब्रह्मवृंदांनी केलेले मंत्रपठण… अशा भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात हा विवाह सोहळा पार पडला. चैत्र शुद्ध द्वितीयेला सकाळी 10  वाजून 54  मिनिटांच्या शुभमुहूर्तावर श्री वल्लभेश मंगलम् हा श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा दगडूशेठ गणपती मंदिरात थाटात पार पडला. भगवान वल्लभेशांच्या महामिलनाचा महोत्सव म्हणजे वल्लभेश मंगलम , त्यामुळे या सोहळा अनुभवण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भगवान श्री गणेश व देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांसह राजाभाऊ घोडके व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. गौरी पालेशा आणि मयूर पालेशा यांनी लग्नसोहळ्याच्या धार्मिक विधीत सहभाग घेतला. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी सोहळ्याचे पौरोहित्य केले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सभामंडपात विविधरंगी फुलांची आकर्षक आरास करुन लग्नमंडपाचे स्वरुप देण्यात आले होते. श्री गणेश व देवी वल्लभा यांच्या मूर्ती सभामंडपात ठेऊन सर्व पारंपरिक विधी पार पडले. ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्र पठणाने या विवाह सोहळ्याला वेगळी उंची प्राप्त झाली. ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते व-हाडी मंडळीच्या भूमिकेत असल्याने पारंपरिक वेशात लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते.

भगवान श्री गणेशाच्या शक्तींचा उल्लेख केला की आपल्या डोळ्यासमोर देवी सिद्धी आणि बुद्धी यांचा विचार येतो. तथापि गाणपत्य संप्रदायात श्री गणेशांच्या विविध शक्तींचा उल्लेख केलेला आहे. परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेश आपल्या स्वानंदेश स्वरूपात एकटे विद्यमान असतात. कधीतरी त्या परमात्म्याला अनेकत्त्वाची इच्छा जागृत होते. या इच्छेला उपनिषदांनी एकोऽहम! बहुस्याम! अशा स्वरूपात वर्णन केले. ब्रह्मणस्पतीला अशी इच्छा झाल्यावर त्या इच्छापूर्तीसाठी ते आपल्या योगमायेला जागृत करतात. ही त्यांची योगमायाच देवी वल्लभा नावाने ओळखली जाते. ती मोरयाची अत्यंत प्रिय असल्याने तिला वल्लभा असे म्हणतात.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

एकट्याच मोरयाच्या स्वरूपात सर्व विश्वाचा आरंभ आहे. देवी वल्लभेच्या प्रगटीकरणाची, मोरयाने तिच्यासह नटण्याची तिथी चैत्र शुद्ध द्वितीया असते. निर्गुण निराकार त्रिगुणातीत परब्रह्म म्हणजे भगवान श्री गणेश. तर आत्ममायायुक्त सगुण साकार त्रिगुणात्मक परब्रह्म म्हणजे श्री गुणेश. देवी वल्लभा आणि तिने युक्त असणा-या भगवान वल्लभेशांच्या महामिलनाचा महोत्सव म्हणजे वल्लभेश मंगलम आहे. त्यामुळे हा सोहळा मंदिरात थाटात साजरा झाला. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Vallabhesh mangalam vivah at dagdusheth halwai ganapati mandir pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 06:39 PM

Topics:  

  • dagadu sheth halwai temple
  • pune ganpati

संबंधित बातम्या

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या 5 ही गणपतींचे विसर्जन; लक्ष्मी रस्त्यावर भाविकांची अलोट गर्दी
1

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या 5 ही गणपतींचे विसर्जन; लक्ष्मी रस्त्यावर भाविकांची अलोट गर्दी

ढोल ताशांच्या गजरात, बाप्पांना निरोप! पुण्यातील मानाच्या 3 गणपतींचे विसर्जन; ‘श्रीमंतां’च्या मिरवणुकीला सुरुवात
2

ढोल ताशांच्या गजरात, बाप्पांना निरोप! पुण्यातील मानाच्या 3 गणपतींचे विसर्जन; ‘श्रीमंतां’च्या मिरवणुकीला सुरुवात

Pune Ganesh Festival: जगात भारी आमचे पुणे! विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘ढोल ताशां’च्या नवीन तालांची पर्वणी
3

Pune Ganesh Festival: जगात भारी आमचे पुणे! विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘ढोल ताशां’च्या नवीन तालांची पर्वणी

Photo : मुग्यांसारखी लोकांची गर्दी…! दगडूशेठ बाप्पाच्या चरणी भक्तांची रीघ,पहा खास फोटो
4

Photo : मुग्यांसारखी लोकांची गर्दी…! दगडूशेठ बाप्पाच्या चरणी भक्तांची रीघ,पहा खास फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.