Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना ‘GPS’ प्रणाली आवश्‍यक ; विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची माहिती

  • By Vivek Bhor
Updated On: Jan 17, 2023 | 09:24 PM
गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना ‘GPS’ प्रणाली आवश्‍यक ; विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची माहिती
Follow Us
Close
Follow Us:

जळगाव : अनोंदणीकृत (Unregistered) व तक्रार नसलेल्या ई-फेर फार नोंदीचा (E-Fair Far Records) कालावधी ३० दिवसांवरुन २५ दिवसांपर्यत आणण्यासाठी महसूल यंत्रणेने (Revenue Department) स्वयंस्फूर्तीने प्रयत्न केले पाहिजेत. ई-ऑफिस प्रणालीचा वापर करावा. गौण खनिजांची वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांना ‘जीपीएस’ प्रणाली लावावीच. वाळू लिलावासाठीची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, अशा सूचना नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे (Nashik Divisional Revenue Commissioner Radhakrishna Game) यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात विभागीय आयुक्त गमे यांच्या अध्यक्षतेखाली महसुल विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, प्रशासकीय यंत्रणांनी नागरीकांची कामे अधिक जलदगतीने तातडीने कार्यवाही करावी. शर्तभंग झालेल्या प्रकरणांसाठी शोध मोहीम, अर्धन्यायीक प्रकरणातील आदेशांची गुणवत्ता तपासणी तसेच ई-पीक पाहणी मोहीम राबवावी. ई-मोजणी, महाराजस्व अभियान, लोकसेवा हमी कायदा, महसुल अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबी, शिस्तभंग कार्यवाही, रिक्त पदे, शासकीय जमीन महुसल व गौण खनिज महसुलाचाही आढावा विभागीय आयुक्त गमे यांनी घेतला.

जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीला रोखणार कोण?

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हािधकारी अमन  मित्तल आिण त्यांच्या पथकाने गिरणा नदीपात्रात उतरून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यािवरोधात धडक कारवाई केली होती. या कारवाईनंतर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना काहीसा चाप बसला. परंतु पुन्हा गेल्या पाच सात दिवसांपासून अवैध वाहतूकीने डोके वर काढले असून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात सप्टेंबर २०२२ पासून मान्सूनकाळात वाळू उचलण्यास बंदी घालण्यात आली आहे. शिवाय वाळू  ठेक्यांची मुदत देिखल संपुष्टात आली असून नव्याने ई ऑक्शन झालेले नाहीत. तसेच ई ऑक्शपूर्वी जिल्हा पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून १९ ऑक्टोबर २०२२ रोजी केवळ १० वाळू साठ्यांची जनसुनावणी घेण्यात आली असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जळगाव  विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी अजय चव्हाण यांनी म्हटले असून जिल्हास्तरावर वाळू घाटांची लिलाव प्रक्रीया देखील प्रलंबित आहे. मात्र असे असले तरी बऱ्याच नदीपात्रातून वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.


जिल्ह्यात नदीपात्रातील वाळू घाटांच्या लिलाव ई ऑक्शन संदर्भात अजून शासनस्तरावरून निर्णय प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत नदीनालेपात्रातून मोठया प्रमाणावार अवैध वाळू उपसा केला जात आहे.  विशेषत: अवैध वाळू उपसा रात्रीच्या वेळी मोठया प्रमाणावर होत असून याकडे स्थािनक प्रशासनाचे अर्थपूर्ण दूर्लक्ष होत असल्याचेच दिसून येत आहे.

[read_also content=”आधी कारला दिली धडक नंतर ड्रायव्हरला स्कूटीने १ किमीपर्यंत फरफटत नेलं, बेंगळुरूच्या रस्त्यावरचा हा अतिशय भयानक Video व्हायरल https://www.navarashtra.com/viral/very-scary-video-scooty-driver-dragged-an-old-man-for-one-km-at-bengaluru-road-viral-nrvb-362493/”]

जलस्त्रोतांची पातळी घटण्याची शक्यता

यासंदर्भात गिरणा, तापीसह अन्य नदीनाले पात्रातून मोठया प्रमाणावर होणाऱ्या  अवैध वाळू उपशामुळे परिसरातील जलस्त्रोतांची पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता  निर्माण झाली असल्याचे स्थािनक ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. वाळू  लिलावासदंर्भात बऱ्याच ठिकाणच्या ग्रामपंचायतींनी विरोध केला असला तरी नेमका त्याच ठिकाणी अवैध वाळू उपसा मोठया प्रमाणावर होत आहे.

ग्रामस्थांचा ‘एल्गार’

तापी नदीपात्रातील अमाप वाळू उपसा विरोधात ग्रामस्थांनीच या विरोधात ‘एल्गार’ पुकारला आहे. गेल्या सप्ताहातच रावेर तालुक्यातील वढोदा व तांदलवाडी येथील ग्रामसभांमध्ये वाळू लिलावास ग्रामस्थांकडून कडाडून विरोध करण्याचा निर्णय विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. यापरिसरात बहुतांश ठिकाणी बोअरवेल असून त्यांची जलपातळी बरीच खोलवर आहे. नदीपात्रातील भरमसाठ वाळू उपसा झाल्याने परिसरातील जलस्त्रोतांची पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली असून, तालुक्यातील उन्हाळ्यात ही परिस्थिती आणखी बिकट होण्याचा धाेका  निर्माण झाला आहे.

[read_also content=”नया है यह! भाचीच्या शाही विवाह सोहळ्यात वऱ्हाडाची बस चालवत पोहोचला अब्जाधीश मामा, बहिणीच्या डोळ्यात तरळले अश्रू; पुढे जे घडलं… https://www.navarashtra.com/viral/viral-news-lakshyaraj-singh-mewar-royal-family-of-udaipur-filled-the-rice-himself-drove-the-bus-nrvb-362471/”]

वाळूमाफियांना बसेल चाप

‘गाव करी ते राव काय करी..! या उक्तीनुसार गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे नदीपात्रातून बेसुमार, नियमबाह्य वाळूचा उपसा करणाऱ्या वाळूमाफियांना यामुळे चाप बसणार आहे. परंतु असे असले तरी बेमुर्वतपणे प्रसंगी अर्थपूर्ण हितसंबध असल्यामुळे यंत्रणेचे काहीअंशी दुर्लक्ष होते. यामुळे मात्र हजारो टन वाळूचा उपसा होतो. नुकसान मात्र गावकऱ्यांचे होते. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते, शेकडो कूपनलिकांची पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. याकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे

वाळू घाटांच्या ई ऑक्शन  लिलावापूर्वी जिल्ह्यातील १० तीन तालुक्यांसाठी १९ ऑक्टोबर २०२२ रोजी जनसुनावणी घेण्यात आली. यात यावल, अमळनेर आणि एरंडोल  तालुक्यातील१० ठिकाणच्या वाळू घाटांसाठी स्थािनक पातळीवर तहसिल तसेच उपविभागीय कार्यालयात जनसुनावणी घेण्यात आली.

अजय चव्हाण, उपप्रादेशिक अधिकारी , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जळगाव

Web Title: Vehicles transporting secondary minerals need gps system information of divisional commissioner radhakrishna game nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2023 | 09:24 PM

Topics:  

  • Divisional Commissioner

संबंधित बातम्या

‘मतदार नोंदणीसाठी आता ऑनलाईन सुविधा उपलब्ध’; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची माहिती
1

‘मतदार नोंदणीसाठी आता ऑनलाईन सुविधा उपलब्ध’; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.