Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र; पुतळा अपघाताने कोसळला म्हणणाऱ्या केसरकरांचा घेतला खरपूस समाचार

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील 8 महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र हा पुतळा कोसळल्यामुळे राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी हा अपघात असल्याचे म्हटले. त्यावर आता विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 27, 2024 | 06:16 PM
विजय वडेट्टीवार यांचा मालवणमधील घटनेवरुन महायुतीवर निशाणा

विजय वडेट्टीवार यांचा मालवणमधील घटनेवरुन महायुतीवर निशाणा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मालवणमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्देवी घटना घडली. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चूक असल्याचा दावा विरोधकांनी केला. तर सदर पुतळा नौदलाकडून उभारण्यात आला होता असे सत्ताधाऱ्यांनी सांगितले. या सर्व प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे.

कंत्राट ठाण्यातील कंत्राटदाराला का दिले?

आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रोष व्यक्त केला आहे. झालेली ही घटना दुर्दैवी असल्याचे देखील वडेट्टीवार म्हणाले आहेत. विजय वडेट्टीवार यांनी शिंदे गटाचे नेते व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची व्हिडिओ शेअर केली आहे. यावरुन रोष व्यक्त करत वडेट्टीवार यांनी लिहिले आहे की, ‘अपघाताने आलेल्या सरकारचं सगळं कामकाजच अपघाती आहे ! महाराष्ट्राच्या नशिबात हे महाविनाशी सरकार आले हाच महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठा अपघात आहे. ज्यातून या राज्याला सावरायला खूप वेळ जाईल. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, चोवीस तास होत आले, राज्य सरकारने चौकशी नेमली का? नौदल आणि राज्य सरकारने एकमेकांकडे बोट दाखवू नये, महाराष्ट्राचा जनतेला कळले पाहिजे की हे कंत्राट ठाण्यातील कंत्राटदाराला का दिले? कंत्राट देण्यासाठी काय प्रक्रिया राबवली?’ असे सवाल देखील विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

अपघाताने आलेल्या सरकारचं सगळं कामकाजच अपघाती आहे! महाराष्ट्राच्या नशिबात हे महाविनाशी सरकार आले हाच महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठा अपघात आहे. ज्यातून या राज्याला सावरायला खूप वेळ जाईल. बदलापूर प्रकरण अपघात होता.
समृध्दी महामार्गावर लोकांचे जीव गेले अपघात होता.
नांदेड मधील शासकीय… pic.twitter.com/Gz7vc0tMmW
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) August 27, 2024

जनतेचा रखवाला दाखवण्यासाठी तिघांची धडपड

पुढे त्यांनी लिहिले आहे की, ‘बदलापूर प्रकरण अपघात होता. समृध्दी महामार्गावर लोकांचे जीव गेले अपघात होता. नांदेडमधील शासकीय रुग्णालयात लोकं मेली अपघात होता. ठाणे शासकीय रुग्णालयात लहान बालके मेली तो अपघात होता. महाराष्ट्रभर ड्रग्सचा सुळसुळाट सुरू आहे तो एक अपघात आहे. ललित पाटील पळाला तो अपघात होता. रोज महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत आहे ते सुद्धा अपघाताने सुरू आहे. असे एक ना अनेक अपघात महाराष्ट्रात सुरू आहे. 3 ड्रायव्हर आणि एक स्टिअरिंग असल्यावर स्टिअरिंग हातात घेण्यासाठी मीच किती मोठा जनतेचा रखवाला हे दाखवण्यासाठी जी धडपड तिघांची सुरू आहे ना त्यामुळेच हे सगळे अपघात घडताय,’ अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी दीपक केसरकर यांच्यासह महायुतीच्या इतर नेत्यांना सुनावले आहे.

Web Title: Vijay vaddetivar slams state government very badly on chhatrapati shivaji maharajas statue collapse incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 06:14 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj Statue

संबंधित बातम्या

राजकोटमध्ये पुन्हा उभारण्यात आला छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित अनावरण सोहळा पार
1

राजकोटमध्ये पुन्हा उभारण्यात आला छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित अनावरण सोहळा पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.