Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेवासा येथे जागतिक दर्जाचा संत ज्ञानेश्वर सृष्टी प्रकल्प,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मराठी भाषेचे महत्व संत ज्ञानेश्वरांनी भगवत गीतेचा भावार्थ ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगून जगासमोर आणले. मराठी भाषेचा गोडवा अन्य भाषिकांना समजावा हा विचार त्यांनी केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 05, 2024 | 07:00 PM
नेवासा येथे जागतिक दर्जाचा संत ज्ञानेश्वर सृष्टी प्रकल्प,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (फोटो सौजन्य-X)

नेवासा येथे जागतिक दर्जाचा संत ज्ञानेश्वर सृष्टी प्रकल्प,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

गिरीश रासकर, अहिल्यानगर: ज्ञानेश्वर सृष्टीच्या अध्यात्मिक प्रकल्पातून नेवासा तिर्थस्थानाचे महत्व विस्तीर्ण स्वरुपात जगासमोर आणण्याचा विचार आहे. वारकरी सांप्रदायाच्या योगदानातून निर्माण होणारा अध्यात्मिक प्रकल्प जिल्ह्याची नवी ओळख ठरेल असा विश्वास महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

सुमारे आठशे कोटी रुपयांच्या तयार करण्यात आलेल्या ज्ञानेश्वर सृष्टीच्या प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण सहकार सभागृहात मंत्री विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातून आणि जिल्ह्यातील वारकाऱ्यांच्या समोर करण्यात आले. रामायणाचार्य रामराव ढोक महाराज, महामंडलेश्वर लहवितकर महाराज ज्ञानेश्वर संस्थांनचे देविदास महाराज म्हस्के, महंत उध्दव महाराज मंडलीक, पांडूरंग अंभग, अरूणगिरीजी महाराज, दिपक महाराज देशमुख, जिल्हाधिकरी सिध्दराम सालीमठ, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपाचे अध्यक्ष दिलीप भालसिंग, विठ्ठलराव लंघे, बाबुशेठ टायरवाले विनायक देशमुख आदी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, मराठी भाषेचे महत्व संत ज्ञानेश्वरांनी भगवत गीतेचा भावार्थ ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगून जगासमोर आणले. मराठी भाषेचा गोडवा अन्य भाषिकांना समजावा हा विचार त्यांनी केला. आज ज्ञानेश्वरीचा ग्रंथ २१ भाषामधून भाषांतरीत झाला आहे. जगाच्या पाठीवर असे एकमेव उदाहरण असलेल्या ग्रथांची निर्मिती आपल्या जिल्ह्यातील नेवासेच्या भूमीत व्हावी हा सर्वासाठी अभिमान आहे.

ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जीवनाचे त्तत्वज्ञान आणि विचारांचे मूल्य विश्वाला संत ज्ञानेश्वरांनी नेवासे येथून दिल्याने या ऐतिहासिक ठिकाणाचे महत्व विस्तीर्ण स्वरुपात जगासमोर आणण्याचा विचार ज्ञानेश्वर सृष्टीच्या उभारणी मागचा असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. या अध्यात्मिक प्रकल्पाचा आराखडा तयार झाला असला तरी यामध्ये वारकरी सांप्रदायाच्या सूचना आम्हाला अपेक्षित आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस व्यक्त करून यासाठी योगदान देण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.

नामांतर निर्णयाचे विखेंकडून केंद्राचे आभार

जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्याचा निर्णय झाल्याचे मोठे समाधान व्यक्त करतानाच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी आणि उज्जैन येथे निर्माण केलेल्या कॉरीडॉरची संकल्पना नेवासा येथे निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

रामायणाचार्य रामराव ढोक महाराजांकडून प्रकल्पाचे स्वागत

दरम्यान रामायणाचार्य ढोक महाराज यांनी वारकर्यांच्या मनात आहे त्याची पूर्ताताविखे पाटील यांनी करण्याचे ठरवले आहे. आपण सर्वजण आता गोपाळ आहोत कृष्णाच्या करंगळीची काठी ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प पूर्ण करेल आशा शब्दात त्यांनी प्रकल्पाच्या संकल्पनेचा गौरव केला.

महामंडलेश्वर लहवितकर महाराज यांनी विखे पाटील परीवाराने वारकरी सांप्रदायाशी जोडलेली नाळ चौथ्या पिढीपर्यत जोडलेली आहे. नेवासे येथील मंदीरासाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी त्याकाळात केलेली वीस हजार हजार रुपयांच्या मदतीची आठवण त्यांनी आवर्जून सांगत आताही ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प त्याचीच अनुभूती असल्याचे त्यांनी याप्रसंगी पांडूरंग अंभग यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वास्तूरचनाकार अजय कुलकर्णी यांनी आराखड्याचे सादरीकरण केले. राज्यात गोसेवा आयोग स्थापन करून गोमातेला राज्यमातेचा घोषित केल्याबद्दल आणि अहिल्यानगर नामतरांसाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल मंत्री विखे यांचा वारकरी सांप्रदायाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Web Title: Vikhe patil on dnyaneshwar creation will bring the identity of tirthasthan to the world in a wide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 07:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.