पीओपी मूर्तीं : मुंबई महानगरपालिकेने चार फुटांवरील गणेश मूर्तीसाठी पीओपीचा वापर करण्यात परवानगी दिली आहे. मात्र चार फुटांपेक्षा कमी उंचीच्या मुर्त्यांसाठी शाडू माती बंधनकारक असेल. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मूर्तिकार आणि मूर्ती विक्रेत्यांसाठी एक खिडकी पद्धत सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता एक खिडकी पद्धतीमुळे ऑनलाईन नोंदणी करणे सुलभ होणार आहे. पर्यावरणाची हानी होत असल्यामुळे पीओपी मूर्तीच्या बाबत संभ्रमता कायम होती. मात्र, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पीओपीला दुसरा पर्याय सुचवण्यात आला नाही. परंतु बाप्पाच्या आगमनासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत.
येत्या काही दिवसांमध्ये बाप्पाचे आगमन होणार आहे. सर्वजण बापाच्या आगमनासाठी जोरदार तयारीला लागले आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी सर्वत्र उत्सुकता पाहायला मिळते. परंतु या वर्षी दर जरी स्थिर असले तरी पीओपीचे गणपती मात्र भाविकांना आकर्षित करत आहेत, पण नैसर्गिकरित्या यामुळे जलप्रदूषण होते. त्याचबरोबर सरकारने पीओपीच्या मुर्त्यांवर बंदी घातली पाहिजे, मातीच्या मातीच्या मूर्ती पर्यावरणासाठी चांगल्या असतात आणि माती पाण्यात सहज विरघळते. पीओपीचे दर कमी असल्यामुळे व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे ग्राहकांनी योग्य मूर्ती ओळखूनच मूर्ती खरेदी करावी, असे मूर्तिकार सांगत आहेत.