वर्धा : शादी डॉट कॉमवर मुलीची ओळख पटवून तिला विश्वासात घेऊन वेळोवेळी पैशाची मागणी करून २५ लाख रुपयांची फसवणूक केली. एवढेच नाही तर पीडितेला लग्नाचे आमीष देवून पचमढी येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना सेवाग्राम पोलीस ठाण्यांतर्गत समोर येताच सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी २९ वर्षीय पीडित तरुणी सध्या सावनेर येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. पीडितेने शादी डॉट कॉम या सोशल साईटवर तिचे प्रोफाइल रजिस्टर केले होते. त्यावर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मरहादेवी येथील रहिवासी सागर पखान पाटील (२९) याने पीडितेला रिक्वेस्ट पाठविली होती. त्या रिक्वेस्ट पीडितेने स्वीकारली होती.