Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खडकवासला धरणातून दिले जाणार शेतीसाठी पाणी; दोन टप्प्यांमध्ये होणार पुरवठा

खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच, ग्रामीण भागातील शेतीसाठी आणि उद्योगासाठीही धरणातून पाणी उपलब्ध करून दिले जाते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 20, 2026 | 10:56 AM
खडकवासला धरणातून दिले जाणार शेतीसाठी पाणी; दोन टप्प्यांमध्ये होणार पुरवठा

खडकवासला धरणातून दिले जाणार शेतीसाठी पाणी; दोन टप्प्यांमध्ये होणार पुरवठा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून शेतीसाठी उन्हाळी हंगामासाठीच्या आवर्तनाला सुरुवात करण्यात आली असून, धरणातील पाणीसाठ्यापैकी नऊ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढे पाणी दोन टप्प्यांमध्ये शेतीसाठी दिले जाणार आहे. शहराच्या पाण्याबाबतचा निर्णय जलसंपदा विभागाकडून राखीव ठेवण्यात आला आहे.

खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच, ग्रामीण भागातील शेतीसाठी आणि उद्योगासाठीही धरणातून पाणी उपलब्ध करून दिले जाते. सध्या खडकवासला धरण प्रकल्पात १९.६ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. खडकवासला धरणातून यापूर्वी ११ डिसेंबर ते १० फेब्रुवारीदरम्यान ६४ दिवसांचे आवर्तन शेतीसाठी सोडण्यात आले होते. त्या माध्यमातून ३.७७ टीएमसी इतके पाणी ग्रामीण भागातील शेतीला देण्यात आले होते. मात्र, उन्हाळ्याची चाहूल लागली असून, शेतीसाठी पाणी सोडण्याची जिल्ह्यातून मागणी होऊ लागली आहे.

हेदेखील वाचा : Pune News : खडकवासला बोगद्याला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी, आठवडाभरात खोदकामाला होणार सुरुवात

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संमतीने उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. शेतीसाठी नऊ टीएमसी पाणी सोडले जाणार असून, हे पाणी दोन टप्प्यांत सोडले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सहा टीएमसी पाणी ३१ मार्चपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात १ ते २० एप्रिलदरम्यान तीन टीएमसी पाणी सोडले जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

उन्हाळी आवर्तनाचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत

उन्हाळी आवर्तनाचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेतला जातो. मात्र, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मान्यतेने उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. या उन्हाळी आवर्तनाचा हवेली, दौंड, बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यातील शेतीला फायदा होणार आहे. एकूण अडीच लाख हेक्टर क्षेत्राला त्याचा फायदा होणार आहे, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

खडकवासला ते फुरसुंगी २८ किमी लांबीचा बोगदा

खडकवासला ते फुरसुंगी २८ किलोमीटर लांबीचा बोगदा केला जाणार आहे. याबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. या कामासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने मान्यता दिली आहे. याबाबतचे पत्र येत्या आठवडाभरात मिळण्याची शक्यता असून त्यानंतर लागलीच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.

Web Title: Water for agriculture will be provided from khadakwasla dam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • Khadakwasla Dam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.