Solapur ZP : 'आम्हाला नोकरी मिळाली...'; अनुकंपाधारकांच्या चेहर्यावर फुलला आनंद
सोलापूर / शेखर गोतसुर्वे : सोलापूर झेडपीच्या इतिहासात पहिल्यांदाच मेगा अनुकंपा भरती करण्यात आली आहे. शासकीय नोकरीपासून वंचित राहिलेल्या ४४ अनुकंपाधारकांना गुरुवारी मोठा दिलासा मिळाला आहे. आम्हा शासकीय नोकरी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर दिसून आला.
गुरुवारी सीईओ कुलदीप जंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत अनुकंपा भरती करण्यात आली. गेल्या महिन्यात १४४ अनुकंपा भरती करण्यात आली होती. सीईओ जंगम यांच्या धाडसी सकारात्मक निर्णयामुळे ते लोकप्रिय ठरत आहेत. त्यांच्या काळात सर्वाधीक नोकऱ्या देणारे सीईओ म्हणून जंगम यांची ओळख निर्माण झाली आहे. पारदर्शक पद्धतीने समुपदेशनाने हवे तिथे नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
झेडपी मुख्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात समपुदेशन घेण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन डेप्युटी सीईओ स्मिता पाटील, प्रशासनधिकारी अविनाश गोडसे, सचिन साळुंखे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.