मुंबई : बुधवारची सकाळ सिनेसृष्टीसाठी धक्कादायक ठरली आहे. कारण प्रसिद्ध कला दिग्दर्शन नितीन देसाई यांनी केली आत्महत्या केल्याची माहिती समोर आहे. (Nitin Desai Sucide) कर्जतमधील एन डी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. कला दिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाई यांनी मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीला (Hindi Cinema) एका वेगळ्या वळणावर व उंचीवर घेऊन गेले होते. तसेच त्यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपट केले होते. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. यावर चित्रपटसृष्टी, सामजिक तसेच राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (we have lost a sensitive genius with a broad artistic vision chief minister eknath shinde tribute to art director nitin desai)
कला क्षेत्रात नितीन यांनी स्वतःच्या हिंमतीवर…
दरम्यान, ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई ( nitin desai) यांचा अकस्मात मृत्यू वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने एक व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ‘कला क्षेत्रात नितीन यांनी स्वतःच्या हिंमतीवर ओळख निर्माण केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सर्जनशीलतेची छाप उमटवणाऱ्या नितीन यांची अशी एक्झिट अपेक्षित नव्हती. त्यांच्या जाण्याने देसाई कुटुंबींयावर आघात झाला आहे. त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे ही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
आर्थिक विंवचनेतून उचललं टोकाचं पाऊल – महेश बालदी
दरम्यान, “नितीन देसाई हे मागील काही दिवसांपासून ते आर्थिक परिस्थितीला तोंड देत होते. स्टुडिओ चालत नव्हता. कोणी शूटिंगसाठी येत नव्हते. काही कलाकारांसोबत त्यांचे भांडण झाले होते. तसेच एन डि स्टुडिओत आमचे कार्यकर्ते देखील कामाला जात होते. त्यांचा पगार देखील काही महिन्यांपासून मिळाला नव्हता. आमची याबाबत एक बैठक सुद्धा झाली होती. लवकरच व्यवस्थित होईल आणि सर्वांचे पैसे मिळतील, असं नितीन देसाईंनी सांगितले होते, पण कामगारांचा पगार मिळाला नाही, स्टुडिओ चालत नव्हता, त्यामुळं आर्थिक चणचण आणि आर्थिक संकट यातूनच देसाई यांनी आत्महत्या केली आहे”. अशी माहिती आमदार महेश बालदी (MLA Mahesh Baldi) यांनी दिली आहे. त्यामुळं आता नितीन देसाईंनी डोक्यावर आलेले आर्थिक संकटातून आत्महत्या केल्याचं कारण समोर आलं आहे.
एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेत संपवलं आयुष्य
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या ही न पचवणारी धक्कादायक बातमी असल्याचं कलाकारांनी म्हटलं आहे. कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत नितीन देसाई यांनी आपले आयुष्य संपवले आहे. सकाळी सफाई कामगार स्टुडिओत गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.
सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट केले
दरम्यान, नितीन देसाई यांनी अनेक प्रसिद्ध हिंदी चित्रपट तसेच ऐतिहासिक मालिका केल्या आहेत. नितिन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते. ‘1942 अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं.