मुंबई– 2022 या वर्षाला निरोप देत आपण 2023 या नव्या वर्षाचे जोरदार जल्लोषात स्वागत केले आहे. आज वर्षाचा पहिला दिवस आहे, त्यामुळं आजपासून आपल्या दैनंदिन व्यवहारात काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. आरबीआयने आजपासून पाच सेवांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. अर्थविश्वातही आजपासून बदल होणार आहेत, त्यामुळे ऐनवेळी तुमचा गोंधळ होऊ नये, फसवणूक होऊ नये किंवा तुम्हाला माहिती नसल्यामुळं तुम्हांला भुर्दड बसू नये, म्हणून तुम्हीही हे बदल आताच वाचून घ्या…
[read_also content=”बापरे! २०२२ वर्षाला निरोप देताना ‘एवढ्या’ जणांचा मृत्यू; तर जखमींचा आकडा ऐकून व्हाल थक्क, पोलिसांनी दिली धक्कादायक… https://www.navarashtra.com/maharashtra/saying-goodbye-to-the-last-year-so-many-died-you-will-be-shocked-to-hear-the-number-of-injured-the-police-gave-a-shocking-information-358320.html”]
बिलिंग व्यवस्थेत बदल
जीएस्टी नियमाचे बदल १ जानेवारीपासून लागू होणार आहेत. म्हणजेच, ज्या व्यवसायांचा टर्नओव्हर ५ कोटी किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यांना आता इलेक्ट्रॉनिक बिल बनवणं गरजेचं आहे. जीएसटीच्या ई-इनवॉइस आणि इलेक्ट्रॉनिक बिलासंदर्भातही काही नियम बदलणार आहेत. इ-इनवॉईससाठी २० कोटींची मर्यादा घटवून ५ कोटी केली आहे.
वाहने चालवणे महागणार
नवीन वर्षात टाटा मोटर्सच्या गाड्यांची किंमत वाढणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. होंडाच्या गाड्यांमध्ये ३० हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात वाहन खरेदी महागणार आहे. प्रमुख ऑटोमोबाईल कंपनी म्हणजेच एमजी मोटर, मारुती सुझुकी, ह्युंडाई मोटर्स, होंडा, टाटा मोटर्स, रेनॉल्ट, ऑडी आणि मर्जिडिज-बेंचर सारख्या कंपन्यांच्या गाड्या महाग होणार आहेत.
पॅन कार्ड
देशात अजूनही अनेक नागरिकांनी पॅन कार्डला आधार कार्ड्स लिंक केलेले नाहीत. त्यामुळे आता हे दोन्ही कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत कार्ड लिंक नाही केले तर १ एप्रिल २०२३ पासून पॅन कार्ड निष्क्रिय केलं जाणरा आहे.
क्रेडिट कार्ड पॉइंट
नव्या वर्षापासून एचडीएफसी बँक आपल्या क्रेडिट कार्डमधील रिवॉर्ड पाँट्समध्ये बदल करणार आहे. त्यामुळे आजच रिवॉर्ड इनकॅश करायला विसरू नका. क्रेडिट कार्डच्या वापरासंदर्भातही १ जानेवारी २०२३ मध्ये नियम बदलणार आहेत. क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यानंतर काही पाँइट्स ग्राहकांना मिळतात, यात मोठे आजपासून बदल होणार आहेत
बँक लॉकर सुविधा
नव्या नियमानुसार बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू चोरीला गेल्यास त्याची जबाबदारी बँकेची असणार आहे. याबाबत बँक आणि ग्राहकांमध्ये करार करण्यात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नव्या वर्षासाठी काही नियम आणले आहेत. त्यानुसार, येत्या वर्षात लॉकरमध्ये ठेवलेल्या अमुल्य वस्तूंची काळजी बँकेलाच घ्यावी लागणार आहे. याबाबत बँक आणि ग्राहकांमध्ये करार करण्यात येणार आहे.