मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. जयंत पाटील पक्षात नाराज असून ते भाजपमध्ये प्रवेश करतीलस अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यानंतर विधानसभेच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील त्यांना पक्षात येण्यासाठी साद घातली होती. जयंत पाटलांबाबत या चर्चा सुरू असतानाच आता गुलाबराव पाटील यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्याच्या राजकारणात सध्या जयंत पाटील चांगलेच चर्चेत आहेत. त्यांना आपल्या गटात सामील करण्यासाठी भाजपसोबतच अजित पवार गटही प्रयत्नशील आहे. आता या स्पर्धेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाही उतरली आहे. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जयंत पाटील लवकरच त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे.
कराडच्या उड्डाणपुलाचे काम सुरु असताना दुर्घटना; भलामोठा सेगमेंटच कोसळला
जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे. त्यामुळे जयंत पाटील शरद पवारांचा गट सोडणार का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. यापूर्वीही जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. विधानसभेच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना उघडपणे आमंत्रण दिले होते. अशातच आता गुलाबराव पाटील यांच्या विधानामुळे नव्या घडामोडींना चालना मिळाली आहे.
“जयंत पाटील हे आमच्याकडे येतील,” असे विधान शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले असून, त्यावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जयंत पाटील यांनी पूर्वीच “मी नाराज नाही, मात्र मला बाहेर बोलण्याची चोरी आहे,” असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील यांनी जयंत पाटील लवकरच त्यांच्या गटात येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार का? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. त्यांच्या संभाव्य निर्णयामागे काही महत्त्वाचे घटक कारणीभूत ठरू शकतात.
“हो…माझी खोक्यासोबत ओळख, आता धनंजय मुंडेंची आमदारकीही जाणार; करुणा मुंडेंनी स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीतील प्रदेशाध्यक्षपदावरून असलेला सुप्त संघर्ष – पक्षातील अंतर्गत राजकारण आणि सत्ता समीकरणे बदलण्याच्या हालचाली.
साखर कारखान्याला आवश्यक असलेली आर्थिक मदत – कारखान्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सत्तेच्या जवळ राहण्याची गरज.
विधानसभा निवडणुकीत घसरलेलं मताधिक्य – मतदारसंघातील घटती ताकद आणि भविष्यातील राजकीय गणिते.
मतदारसंघातील विकासकामांसाठी सत्तेला प्राधान्य – स्थानिक पातळीवर विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रभावी भूमिका.
मंत्रिमंडळातील रिक्त मंत्रिपदाचा मोह – शिंदे-फडणवीस सरकारमधील उपलब्ध मंत्रिपदावर दावा सांगण्याची संधी.
या सर्व घटकांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील पुढे काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.