Local Body Election 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यभरातील सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षांतर्गत बैठकांचाही जोर वाढला आहे. हे सर्व सुरू असतानाच महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तयारीला सुरूवात केल्याची माहिती आहे. निवडणूक आयोगाने राज्य सरकारला प्रभाग रचनेसंदर्भात सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लकवरच स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजू शकतो, असे बोलले जात आहे.
मागील चार-पाच वर्षांपासून राज्यातील अनेक महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांच्या आत या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने आवश्यक ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रभाग रचनेच्या प्रक्रियेसाठी आयोगाने राज्य सरकारला आवश्यक सूचना दिल्या आहेत.
राज्य सरकारने प्रभाग रचनेची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. यानंतर आरक्षण निश्चिती आणि अंतिम मतदार याद्यांसदर्भात पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रभाग रचनेची माहिती या आठवड्यात निवडणूक आयोगाला सादर होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात राज्य सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. तसेच, या प्रक्रियेसाठी चार आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेला सुरूवात केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारने स्वतःकडे घेतले होते. मात्र, आता ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत.
आता चॅटिंग होणार आणखी मजेदार! Elon Musk ने लाँच केला XChat, फोन नंबरशिवाय कॉलिंग आणि जबरदस्त
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘मिशन १५०’ च्या माध्यमातून भाजपने स्वतंत्र महापौर निवडण्याचे ध्येय बाळगले असून, यासाठी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने भाजपने नवीन कार्यकारी संघ रिंगणात उतरवला आहे. ईशान्य मुंबईसाठी दीपक दळवी, उत्तर मुंबईसाठी दीपक तावडे, उत्तर पश्चिम मुंबईसाठी ज्ञानमूर्ती शर्मा, उत्तर मध्य मुंबईसाठी वीरेंद्र म्हात्रे, दक्षिण मध्य मुंबईसाठी नीरज उभे आणि दक्षिण मुंबईसाठी शलाका साळवी यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या संघाला प्रचार आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.