मुंबई- कर्जबाजारी दूरसंचार कंपनी वोडाफोन आयडिया (vodafone and Idea) या कंपनीच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. एका अहवालानुसार, दूरसंचार (Telecom) क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे व्होडाफोन आयडिया अडचणीत सापडली आहे. वाढत्या कर्जामुळे आणि आवश्यक निधी उभारण्यात होणारा विलंब यामुळे वाढलेल्या स्पर्धेमुळे कंपनीचे कामकाज बंद होऊ शकते. देशांतर्गत ब्रोकरेज कंपनी कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने सोमवारी एका अहवालात हा दावा केला आहे. त्यामुळं वोडाफोन आयडिया (vodafone and Idea) ही कंपनी जर बंद झाली तर, २३ करोडो ग्राहकांचे काय होणार, असा सवाल विचारण्यात येत आहे.
२३ करोडो ग्राहकांचे काय होणार?
अहवालात असे म्हटले आहे की महागाई RBI च्या सहन करण्यायोग्य पातळीच्या वर राहिल्याने, दूरसंचार कंपन्या पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर, शक्यतो जून 2024 मध्ये टॅरिफ दर वाढवण्यास सुरुवात करतील. टॅरिफ दर वाढीशिवाय, व्होडाफोन आयडिया आवश्यक गुंतवणूक करू शकणार नाही आणि 5G सेवा सुरू करू शकणार नाही. यामुळे कंपनीच्या ग्राहकांची संख्या आणखी कमी होईल आणि भांडवल उभारणीची योजना प्रत्यक्षात आणणे कठीण होईल. त्यामुळं ही कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, जर वोडाफोन आयडिया (vodafone and Idea) ही कंपनी बंद झाली तर, २३ करोडो ग्राहकांचे काय होणार, या ग्राहकांचे काय, असा सवाल विचारण्यात येत आहे.
दोनच कंपन्या राहणार?
दरम्यान, सध्या बाजारातील वाढती स्पर्धा तसेच कंपन्याकडून मिळणारी चांगली सेवा यामुळे बाजारात रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या दोनच कंपन्या उरतील. या कारणास्तव, दीर्घकालीन दोन कंपन्यांच्या मक्तेदारी स्थितीबद्दल चिंता आहे. ब्रोकरेज कंपनीच्या म्हणण्यानुसार, टेलिकॉम कंपन्या सार्वत्रिक निवडणुकांनंतरच जून 2024 मध्ये टॅरिफ वाढवण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे किरकोळ चलनवाढ RBI च्या सुसह्य मर्यादेपेक्षा जास्त असणे आणि राज्यांमधील निवडणुका. अहवालानुसार, “टेरिफ दर वाढवण्यास विलंब व्होडाफोन आयडियावर विपरित परिणाम होईल, असं बोललं जात आहे.