पुणे – ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने पुण्यातील पहिल्या फायर ‘वुमन’ मेघना सपकाळ यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. आगीपासून प्रत्येक जण म्हणजे महिला असो वा पुरुष चार हात लांबच राहत असतो. आग लागली की सर्वजण मागे होतात. कोणालाच आगीशी खेळणे आवडत नाही. मात्र पुण्यातील अग्निशमन दलामध्ये पहिल्यांदा एका महिलेची निवड झाली आहे. महिला दिनासाठी मेघना सपकाळ यांच्यासोबत नवराष्ट्र डीजिटल टीमने केली खास बातचीत.
नवराष्ट्र डिजीटलसोबत बोलताना मेघना हिने तिच्या इथेपर्यंत येण्याचा प्रवास सांगितला. मेघना सपकाळ म्हणाल्या, माझ्या घरातूनच मला अग्निशमन दलाचे एक प्रकारचे बाळकडू मिळाले आहे. माझे, आजोबा, वडील हे देखील अग्निशमन दलामध्ये होते. त्यामुळे मला कधीच या क्षेत्राची भीती वाटली नाही. मला घरांच्यांनी या क्षेत्राबद्दल विचारले आणि मी लगेचचं तयारी करण्यास हो बोलले. या क्षेत्रातील आमची तिसरी पिढी असून मी घरातील वारसा पुढे चालवायला मिळाला. असे मत मेघना सपकाळने मांडले.
पुढे फायरवुमन मेघना सपकाळ यांनी जिद्दी आणि चिकाटीच्या बळावर केलेल्या तयारीबद्दल सांगितले. मेघना म्हणाल्या, 2019 पासून मी अग्निशमन दलासाठी तयारी करत आहे. फिजिकल ट्रेनिंग देखील मी पूर्ण केलं. कोरोना काळाचा सदुपयोग करत माझ्यामध्ये मी बदल केले आणि भरतीची तयारी केली. मी या आधी मुंबईमध्ये एकदा परिक्षा दिली होती. मात्र रनिंगमध्ये मी कमी पडले. पुन्हा एकदा न हारता मी जोमाने तयारी सुरु केली. दुसऱ्या प्रयत्नामधून मी पुण्यातून अग्निशमन दलामध्ये सामील झाले.” असा अनुभव मेघना सपकाळ यांनी मांडला. पुण्यातील पहिल्या महिला फायर वुमन मेघना सपकाळ यांनी या क्षेत्राचा विचार महिलांनी नक्की करावा आणि जास्तीत जास्त महिलांनी अग्निशमन दलाच्या भरतीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महिला दिनाच्या निमित्ताने केले आहे.