मुंबई : गोदरेज कन्ज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचा (Godrej Consumer Products Limited) एक भाग आणि भारतातील आघाडीचा मॉस्किटो रेपेलंट ब्रँड गुडनाईटने (Mosquito repellent brand GoodKnight) जागतिक डास दिनाचे (World Mosquito Day) (२० ऑगस्ट) औचित्य साधून एक विशेष सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.
लहान मुलांचे आरोग्य आणि आजार पसरवू शकणारे डास मुलांच्या आरोग्यावर कसे विपरीत परिणाम करू शकतात याविषयी जागरूकता निर्माण करणे हा गुडनाईटचा या उपक्रमामागील उद्देश आहे. भारतात बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात या आठ राज्यांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार असून सध्या महाराष्ट्रामध्ये घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधून, वेक्टर जनित आजारांची व्याप्ती व गांभीर्य याविषयी त्यांना माहिती देण्याचे काम केले जात आहे.
महाराष्ट्रामध्ये वेक्टर जनित आजारांच्या केसेस २०२१ मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्या. नॅशनल वेक्टर बोर्न डीसीज कंट्रोल प्रोग्रामकडील आकडेवारीनुसार राज्यात मलेरियाच्या १९३०३ आणि डेंग्यूच्या १२७२० केसेस आढळून आल्या. २०२२ मध्ये ही वाढ ओसरावी यासाठी राज्यभरात खबरदारी घेतली जात आहे.
‘नींदों को नजर ना लगे’ या अभियानांतर्गत गुडनाईट ब्रँडकडून केल्या जात असलेल्या विविध प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा जागरूकता कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. मुलांना शांत झोप मिळाली नाही तर त्यांच्या एकंदरीत आरोग्यावर आणि वाढीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो याविषयी पालकांना जागरूक करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. भारतातील १८ लाखांहून जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना हा संदेश देण्याचे लक्ष्य गुडनाईटने आखले आहे.
गोदरेज कन्ज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या (जीसीपीएल) चीफ मार्केटिंग ऑफिसर सोमश्री बोस अवस्थी यांनी सांगितले, “डासांविरोधात सर्वोत्तम संरक्षण उपाय मिळवून देऊन प्रत्येक कुटुंबाला सक्षम बनवण्यासाठी गुडनाईट वचनबद्ध आहे. मुलांच्या झोपेवर आणि त्यामुळे त्यांच्या वाढीवर देखील डासांचे किती हानिकारक परिणाम होऊ शकतात याविषयी जागरूकता वाढवण्याचा आमचा उद्देश आहे. लोकांशी प्रत्यक्ष संपर्क साधल्यावर आमच्या असे लक्षात आले की, बहुतांश लोकांना याची कल्पना देखील नाही की एक डास सुद्धा मुलांच्या आरोग्यासाठी किती भयानक ठरू शकतो आणि याचे प्रमुख कारण आहे योग्य माहितीचा अभाव. म्हणूनच अनेक लोक रेपेलंट म्हणून या कुचकामी उपायांचा वापर करत होते. या जागरूकता उपक्रमामार्फत आम्ही लोकांना त्यांच्या मुलांच्या सर्वांगीण विकासाला पूरक ठरेल अशी माहिती देऊन सक्षम बनवू.”
घरोघरी जाऊन माहितीपर पत्रके वाटली जात आहेत, तसेच लोकांसोबत प्रत्यक्ष बातचीत देखील केली जात आहे. गुडनाईटला या उपक्रमात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून बहुतांश लोक अधिक सुरक्षित व धूररहित मॉस्किटो रेपेलंट वापरण्यासाठी तयार आहेत. या अभियानामध्ये आशा कार्यकर्ते, अंगणवाडी कर्मचारी व सुईणी यांच्या ग्रामीण समुदाय आरोग्य देखभाल नेटवर्कचा वापर करून घेण्याची ब्रँडची योजना आहे.
डास आणि रेपेलन्टस यांच्या हानिकारक प्रभावांचा त्रास ज्यांना सर्वात जास्त होऊ शकतो अशी लहान मुले ज्यांच्याकडे आहेत अशा मातांशी संपर्क साधला जावा यासाठी हे करण्यात येत आहे. मुलांच्या वाढीसाठी, एकंदरीत आरोग्यासाठी पोषण, लसीकरण आणि शांत झोप यांचे महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या चर्चांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण त्यांना देण्यात येणार आहे.