१५ शहरं, पोलिसांची ३५ पथकं; सैफवरील हल्लेखोराच्या ७२ तासात कशा आवळल्या मुसक्या?
सैफ अली खानच्या हल्लेखोराला ७२ तासांनंतर अटक करण्यात आली आहे. हल्लेखोराला पकडण्यासाठी मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेची सुमारे 35 पथके तैनात करण्यात आले आहे. या टीममध्ये १०० हून अधिक पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता. पोलिसांनी हल्लेखोराचा १५ हून अधिक शहरांमध्ये हल्लेखोराचा शोध घेण्यात आला. अखेर आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर मोहोम्मद शरीफूल इस्लाम शहजादला पोलिसांच्या ताब्यात कसा आला ते जाणून घेऊया?
‘साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’नंतर सचित पाटील करणार “असंभव” चित्रपटाचे दिग्दर्शन
सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर बांगलादेशचा रहिवासी असल्याचा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी बांगलादेशातील झलोकाठी येथील राजाबरिया गावचा रहिवासी आहे. 5-6 महिन्यांपूर्वी तो मुंबईत आला होता. तो बेकायदेशीरपणे भारतात घुसला होता. आपले नाव लपवण्यासाठी तो विजय दास म्हणून राहत होता. आरोपीकडे कोणतीही भारतीय कागदपत्रे नाहीत. आपली ओळख लपवण्यासाठी त्याने अनेक नावे बदलली. मुंबई पोलीस आरोपी मोहोम्मद शरीफूल इस्लाम शहजादला वांद्रे पूर्व न्यायालयात हजर करणार आहेत. न्यायालयात हल्लेखोराच्या कोठडीची मागणी पोलीस करणार आहेत.