अल्लू अर्जुनच्या घराबाहेर तोडफोड; 8 जणांना घेतलं ताब्यात
‘पुष्पा २’च्या प्रीमिअर शोदरम्यान हैदराबादमधील एका चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत दोन प्रेक्षकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनच्या अडचणी कमी होत नसताना रविवारी सायंकाळी त्याच्या घरासमोर घराबाहेर तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी ८ जणांना ताब्यात घेण्यात आलं असून घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Alka Kubal: लेक पायलट असलेल्या विमानातून अलका कुबल यांचं उड्डाण, शेअर केली खास पोस्ट, पाहा PHOTO!
उस्मानिया विद्यापीठ संयुक्त कृती समितीच्या (जेएसी) सदस्यांनी रविवारी सायंकाळी अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरी निदर्शने केली. अल्लू अर्जुनने महिलेच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची मदत द्यावी आणि कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करावी अशी मागणी आंदोलकांंनी केली आहे. आंदोलकांनी अल्लू अर्जुनच्या घराबाहेर घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जेएसीच्या नेत्यांना ताब्यात घेतलं. याप्रकरणी 8 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेवेळी अल्लू अर्जुन त्याच्या घरी उपस्थित नव्हता.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून आंदोलकांना शांत राखण्यासाठी आवाहन केलं आहे. या निदर्शनाचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये आंदोलक अभिनेत्याच्या घरासमोर निदर्शने करत आहेत. त्यांनी प्रचंड गोंधळ घातला आणि बाहेरील तोडफोड केली.
‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत अभिनेता आशुतोष गोखलेची एन्ट्री, दिसणार खलनायकी भूमिकेत
अल्लू अर्जुनच्या पुष्पा-२ चित्रपटाची सध्या जबरदस्त क्रेझ आहे. अल्लू अर्जुनचे करोड चाहते आहेत. दरम्यान पुष्पा-२ रिलीज झाल्यानंतर हैदराबादमधील आरटीसी एक्स रोडवरील संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुन पोहोचला होता. मात्र झालेल्या चेंगराचेंगरीत दोन चाहत्यांचा मत्यू झाला होता. त्यानंतर अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटकही झाली होती. पोलिसांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ आणि ११८(१) अंतर्गत अभिनेता अल्लू अर्जुन, त्याचं सुरक्षा पथक आणि चित्रपटगृह व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. मात्र न्यायालयाने त्यांला जामीन मंजूर केला होता.
‘पुष्पा 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. चित्रपट तिसऱ्या आठवड्यात दाखल झाला आहे. त्याच्या कमाईत घट झाली असली तरी, हे सर्व असूनही केवळ 16 दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींची कमाई करणारा हा सर्वात जलद चित्रपट ठरला आहे. त्याच्या कमाईच्या ताज्या आकडेवारीवर एक नजर टाकूया.
पहिल्या आठवड्यातच इतिहास रचला
‘पुष्पा 2’ ने रिलीज होताच स्पष्ट केले होते की तो बॉक्स ऑफिसवर राज्य करण्यासाठी आला आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने 175 कोटींची ओपनिंग करून ट्रेड पंडितांनाही आश्चर्यचकित केले. त्याच वेळी, एका आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 725.8 कोटी रुपयांची कमाई करण्यात यशस्वी झाले. ‘पुष्पा 2’ हा 200 कोटी, रु. 300 कोटी, रु. 400 कोटी आणि 500 कोटींची कमाई करणारा सर्वात जलद चित्रपट ठरला आणि तेव्हापासून हा ट्रेंड सातत्याने सुरू आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.