बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Aalia Bhatt) हिने काही वेळेपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बॉलिवूडचे क्युट कपल असलेल आलिया आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे दोघे आई-बाबा झाले असून संपूर्ण कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
आज सकाळी ७ :३० च्या सुमारास आलीया ला प्रसूतीसाठी सर एच एन रिलायंस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे दोघे १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नबंधनात अडकले असून ते अनेक वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये होते.