Raksha Bandhan च्या दिवशी रिलीज झालेले 'हे' 2 चित्रपट ठरले सुपर फ्लॉप
भारतात वर्षाला हजारो चित्रपट प्रदर्शित होत असतात. यात काही ब्लॉकबस्टर ठरतात, काही सुपरहिट आणि काही फ्लॉप ! देशात वेगवेगळ्या भाषेतील फील इंडस्ट्री आहे. यात सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री म्हणजे बॉलिवूड. आजपर्यंत, बॉलिवूडच्या कित्येक चित्रपटांनी 100, 200 आणि 300 कोटींचा गल्ला जमावाला आहे. विशेषकरून जे चित्रपट सणासुदीच्या वेळी प्रदर्शित होतात, त्यांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन चांगले होते. मात्र, आज आपण अशा 2 चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात जे रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित होऊन सुद्धा फ्लॉप ठरले.
बॉलिवूडमध्ये सणांचे दिवस नेहमीच खास मानले जातात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सलमान खान त्याच्या बहुतेक फिल्म्स ईदला प्रदर्शित करतो, तसेच रोहित शेट्टी दिवाळीला त्याचे चित्रपट प्रदर्शित करतो. परंतु 2022 मध्ये दोन स्टार्सनी त्यांचे चित्रपट रक्षाबंधनावर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला जो अयशस्वी ठरला.
२५ वर्षांपूर्वी ऐश्वर्या रायचा ‘भाऊ’ बनणार होता सलमान खान, मग असं काय घडलं की…, जाणून घ्या
Aamir Khan चा लाल सिंग चड्ढा आणि Akshay Kumar चा रक्षाबंधन 2022 च्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रदर्शित झाले. परंतु हे दोन्ही चित्रपट अपयशी ठरले आणि फ्लॉप झाले. रक्षाबंधनसारख्या विषयावर बनलेला अक्षय कुमारचा चित्रपट प्रेक्षकांना आपलासा वाटला नाही.
अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट सुमारे 70 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाने भारतात सुमारे 43 कोटी आणि जगभरात 61 कोटींची कमाई केली होती. दुसरीकडे, आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’, जो हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा रिमेक होता, तो काही खास प्रेक्षकांना आकर्षित करू शकला नाही. आमिरचा हा चित्रपट 180 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनवण्यात आला होता आणि त्याने भारतात फक्त 61 कोटी आणि जगभरात 133 कोटींची कमाई केली.
अशाप्रकारे, रक्षाबंधनाच्या सणावर बॉलिवूडच्या दोन्ही सुपरस्टारना बॉक्स ऑफिसवर पराभवाचा सामना करावा लागला. या अपयशावरून असे दिसून आले की प्रेक्षकांना खरा आणि चांगला कंटेंट हवा आहे तरच ते तुमचा चित्रपट पाहायला येतील.
राघव जुयालने साक्षी मलिकच्या कानशिलात मारली? Viral Video; नक्की प्रकरण काय…
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, आमिर खानचा शेवटचा चित्रपट ‘सितारे जमीन पर’ होता आणि आता तो ‘कुली’मध्ये एका नवीन भूमिकेत दिसणार आहे, जो 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना त्याचा लूक खूप आवडला आहे. रजनीकांत ‘कुली’मध्ये मुख्य भूमिकेत आहेत, त्यांच्याशिवाय नागार्जुन, सत्यराज, उपेंद्र आणि श्रुती हासनसारखे कलाकारही दिसतील. अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘जॉली एलएलबी ३’ यांचा समावेश आहे.