प्रभू श्री रामाच्या भूमिकेनंतर रणबीर कपूर आता एलियन होणार, PK 2 मध्ये आमिर खान कोणती भूमिका साकारणार ?
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता आमिर खान ‘लाल सिंह चड्ढा’नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल ४ ते ५ वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर आमिर खान एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिर खान स्टारर ‘सितारे जमिन पर’ हा चित्रपट येत्या २० जूनला चाहत्यांच्या भेटीला येतोय. सध्या या चित्रपटामुळे चर्चेत राहणारा आमिर खान त्याच्या आणखीन एका नवीन चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘पीके’चा सीक्वेल येणार आहे, याबद्दलचे वृत्त एका रिपोर्टमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.
“स्टार किड असणं…”, अध्ययन सुमनलाही करावा लागला रिजेक्शन्सचा सामना; ‘घराणेशाही’वर स्पष्टच म्हणाला…
अलीकडेच आलेल्या एका बातमीनुसार, राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली आमिर खान दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत काम करणार आहे. लवकरच तो चित्रपटाच्या शुटिंगलाही सुरुवात करणार आहे. आता एका नवीन वृत्तानुसार, लवकरच आमिर खान ‘पीके २’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता एलियनची भूमिका साकारणार आहे. इतकंच नाही तर, ‘पीके २’ चित्रपटात आमिरसोबत रणबीर कपूरही असण्याची शक्यता आहे. याशिवाय, आमिर गुलशन कुमार यांच्या बायोपिकमध्ये आणि एक सुपरहिरो चित्रपट करण्याचाही आग्रह करत आहे.
अनुराग बसूच्या ‘Metro In Dino’चा ट्रेलर रिलीज, प्रत्येक वयोगटातली भन्नाट लव्हस्टोरीची मेजवाणी मिळणार
‘पिंकविला’ने दिलेल्या वृत्तानुसार, आमिर खानने राजकुमार हिरानी यांच्यासोबत दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकवर काम सुरू करण्यापूर्वी किमान १० नवीन स्क्रिप्ट्सचा विचार केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांचे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावर चित्रपट बनवण्याचे स्वप्न होते आणि त्याची पटकथा बऱ्याच काळापासून सुरू होती. राजकुमार हिरानी हे दादासाहेब फाळकेवर काम करत असताना, आमिर इतर अनेक पटकथांवरही विचार करत होता.
काजोलच्या काकांच्या प्रार्थना सभेत जया बच्चन का भडकल्या? पापाराझींवर पुन्हा व्यक्त केला संताप!
उज्ज्वल निकम यांच्या बायोपिक आणि किशोर कुमारसह १० पटकथांवर सध्या अभिनेता चर्चा करीत आहे. असे म्हटले जाते की, आमिरने त्याच्या तीन वर्षांच्या ब्रेकमध्ये ज्या १० पटकथांवर चर्चा केली आहे त्यात राजकुमार संतोषी यांचे ‘चार दिन की जिंदगी’ आणि ‘अंदाज अपना अपना २’ ह्या दोन चित्रपटांचाही त्यात समावेश आहे. याशिवाय, त्याने सुप्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांच्या दिनेश विजन यांच्यासोबतचा बायोपिक, अनुराग बसू यांच्यासोबतचा किशोर कुमार यांचा बायोपिक आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबतचा चित्रपट यावरही चर्चा केली आहे.
IPL 2025: PBKS च्या पराभवावर भावुक झाली प्रीती झिंटा, श्रेयस अय्यरची थोपटली पाठ; Video Viral
सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खानने दिग्दर्शक तुषार हिरानंदानी आणि भूषण कुमार यांचीही भेट घेतली आहे. यादरम्यान तिघांनी गुलशन कुमार यांच्या बायोपिकवर चर्चा केली. तथापि, या चित्रपटाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही आणि हे सर्व चर्चा आणि चर्चांच्या पातळीवर आहे. तथापि, आमिरचे संपूर्ण लक्ष पडद्यावर दादासाहेब फाळके यांची भूमिका साकारण्यावर आहे.
या चित्रपटांव्यतिरिक्त, आमिर खान, राजकुमार हिरानी आणि अभिजित जोशी यांच्यात ब्लॉकबस्टर हिट ‘पीके’च्या सिक्वेलची म्हणजेच ‘पीके २’ बद्दल चर्चा झाली आहे. सध्या, सिक्वेलमध्ये कथा कशी पुढे नेता येईल याबद्दल चर्चा सुरू आहे. जर सर्व काही ठीक राहिले तर रणबीर कपूर देखील या फ्रँचायझीमध्ये प्रवेश करू शकतो.