Adhyayan Suman On The Flip Side Of Being A Star Kid
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ‘नेपोटिझम’चा मुद्दा कायमच चर्चेत असलेल्या एका मुद्द्यांपैकी आहे. या मुद्द्याची कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चा होत असते. आता अशातच सध्या हा मुद्दा चर्चेत आला आहे. त्याचं कारण म्हणजे, बॉलिवूड अभिनेता शेखर सुमनच्या मुलगा… गेल्या सहा महिन्यांपासून बॉलिवूड अभिनेता शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमन याच्या हाती कोणतेही काम नाही. त्यामुळे तो सध्या नवीन कामाच्या शोधात आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेबसीरीजमध्ये अभिनेत्याने शेवटचे काम केले होते. तेव्हापासून ते आजवर अभिनेत्याच्या हातात कोणताही चित्रपट किंवा वेबसीरीज नाही.
Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना ‘मामा’ म्हणून हाक का मारतात? जाणून घ्या
हातात कोणताही चित्रपट किंवा वेबसीरीज नसताना बॉलिवूड अभिनेता अध्ययन सुमनने एक मुलाखत दिली. ‘IANS’ला दिलेल्या मुलाखतीत अध्ययन सुमनने बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावर भाष्य केले. सांगितले की, स्टार किड्सना यशाची हमी असते ही धारणा पूर्णपणे चुकीची आहे. त्यांच्या फिल्मी करियरमध्ये त्यांना नकार आणि अपयश अशा परिस्थितींचा सामना करावा लागतो. अध्ययन सुमन मुलाखती दरम्यान म्हणाला की, “हो, मी एका फिल्मी कुटुंबातून येतो. माझे आई- वडिल दोघेही आधीपासून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत. पण सत्य हे आहे की, मला कोणीही आपल्या ताटातली गोष्ट दिली नाही. माझ्या वडिलांनी आणि आईने मला भावनिक आधार दिला, परंतु मला प्रत्येक ऑडिशनसाठी, प्रत्येक मीटिंगसाठी, प्रत्येक क्षणला संघर्ष करावा लागला, हे मात्र खरं आहे.”
अनुराग बसूच्या ‘Metro In Dino’चा ट्रेलर रिलीज, प्रत्येक वयोगटातली भन्नाट लव्हस्टोरीची मेजवाणी मिळणार
मुलाखती दरम्यान अभिनेत्याने पुढे सांगितले की, “अनेक लोकांना असं वाटतं की, स्टारकिड्स झाल्यावर आपल्या करियरमध्ये यशाची हमी आहे, पण ते खरे नाही. मी अनेक वेळा नकार आणि अपयशाचा सामना केला आहे आणि मला अनेक वेळा नाकारण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे मी कधीही स्वतःवर विश्वास ठेवणे थांबवले नाही.” अध्यायन सुमनने सांगितले की, चित्रपट आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये पहिल्यापासून पुरुषप्रधान संस्कृती कायम राहिली आहेत. विशेषतः जेव्हा प्रतिनिधित्व आणि समान संधींचा विचार केला जातो. अभिनेत्याचा असा विश्वास आहे की, बदल हळूहळू पण स्थिरपणे होतो आणि त्याचे श्रेय अधिक संतुलित कथा सांगण्यासाठी वचनबद्ध असलेल्या चित्रपट निर्मात्यांना जाते.
काजोलच्या काकांच्या शोक सभेत जया बच्चन का भडकल्या? पापाराझींवर पुन्हा व्यक्त केला संताप!
मुलाखती दरम्यान अभिनेता पुढे म्हणाला की, “विशेषतः मानधन आणि संधीच्या बाबतीत इंडस्ट्रीमध्ये लैंगिक असमतोल निर्माण झाली आहे. पण बदल घडत आहे. भन्साळी सरांसारख्या चित्रपट निर्मात्यांनी असे काम केले आहे. ते केवळ महिलांना मुख्य भूमिकांमध्येच घेत नाहीत तर ते त्यांना वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका देत असतात. अध्ययन सुमनने त्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगितले की, येत्या काही महिन्यांमध्ये त्याचे ४ चित्रपट आणि ६ गाणी रिलीज होणार आहेत. अध्ययन सुमनने २००८ पासून आपल्या फिल्मी करियरला सुरुवात केली. अध्ययन सुमन हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन आणि निर्माती अलका सुमन यांचा मुलगा आहे. त्याने २००८ मध्ये ‘हाल-ए-दिल’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो त्याच्या दुसऱ्या चित्रपट “राज – द मिस्ट्री कंटिन्युज” मध्ये दिसला होता.