
"घरात मी काहीही फोडू शकतो..." बिग बॉसच्या घरात येताच अभिजीत बिचुकले सदस्यांवर संतापला, अंकिताला म्हणतो...
बिग बॉसच्या घरातला नऊवा आठवडा बराच वादळी ठरला आहे. बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशातच बिग बॉसच्या घरात आता दोन वाईल्ड कार्ड स्पर्धक घरातल्या सर्वच स्पर्धकांची झोप उडवायला आले आहेत. राखी सावंतनंतर अभिजीत बिचुकलेही बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार आहे. काही तासांपूर्वीच कलर्स मराठीकडून अभिजीत बिचुकलेच्या एन्ट्रीचा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे.
हे देखील वाचा – यंदाच्या ऑस्करमध्ये मराठी चित्रपटांची मोहोर, ‘घरत गणपती’ आणखी एका चित्रपटाची निवड
अभिजीत बिचुकले यापूर्वी ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. आता त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात स्पर्धक म्हणून अभिजीत सहभागी झालेला आहे. कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारा अभिजीत बिचुकले सध्या ‘बिग बॉस मराठी’ मुळे चर्चेत आला आहे. अभिजीतने बिग बॉसच्या घरात एन्ट्री करताच स्पर्धकांची चांगलीच कानउघडणी केली आहे. त्याने घरात एन्ट्री करताच तोडफोड करण्याचीही भाषा वापरली आहे. त्यामुळे अभिजीतच्या एन्ट्रीची जोरदार चर्चा होत आहे.
शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, अभिजीत बिचुकलेची घरात एन्ट्री होताना पाहायला मिळत आहे. घरात येताच बिचुकले म्हणतो,”डॉ. अभिजीत बिचुकलेका सादर नमस्कार…” अभिजीतच्या एन्ट्रीला ‘मैं हूँ डॉन” हे गाणं खास वाजवण्यात आलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा त्याच्या स्टाईलने धुमाकूळ घालताना दिसून येणार आहे. बिग बॉसच्या घरात अभिजीतला पाहून फक्त घरातले स्पर्धकच नाही तर प्रेक्षकही पोट धरून हसू लागले आहेत. प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकले सदस्यांचा पाणउतारा करताना दिसत आहे. अंकिताची शाळा घेत बिचुकले म्हणतो,”बहिण असं कधीच करत नाही, कुचकेपणा तुमचा दिसला. राग येतोय मला…मी काहीही फोडू शकतो या घरातलं”.
हे देखील वाचा – ‘धर्मवीर २’ची धमाकेदार सुरूवात, पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई
अंकिता जे सूरजसोबत वागली, ते चुकीचं होतं असं म्हणत अंकिताला चांगलंच झापलं आहे. बिचुकलेचं हे विधान ऐकूण काही वेळ का होईना अंकिता अचंबित होते. सोशल मीडियावर हा प्रोमो चांगलाच व्हायरल होत असून राखी सावंत आणि अभिजीत बिचुकले कोणकोणत्या सदस्यांचा पाणउतारा करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये, नेटकऱ्यांकडून निक्कीचं आता काही खरं नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. अभिजीत बिचुकलेसोबतच राखीच्या एंट्रीचा प्रोमोही खूपच चर्चेत आहे. त्यामुळे अभिजीत आणि राखीच्या एन्ट्रीने आज घरात राडा, धिंगाणा आणि ड्रामा असं सर्वकाही पाहायला मिळणार हे नक्की.