LGBTQ समाजाच्या हक्कासाठी झगडणारा नक्षत्र बागवे आहे तरी कोण ? जाणून घ्या सविस्तर
सध्या युट्यूबसह सोशल मीडियावर नक्षत्र बागवेच्या ‘द व्हिजिटर’ (The Visitor)वेबसीरीजची जोरदार चर्चा होत आहे. या वेबसीरीजचा नुकताच चौथा सीझन रिलीज झाला आहे. या सीझनचे १० एपिसोड ‘नक्षत्र बागवे’ ह्या युट्यूब चॅनलवर रिलीज झाले आहेत. सध्या सीरीजच्या प्रमोशननिमित्त नक्षत्र व्यग्र आहे. प्रमोशनदरम्यान नक्षत्र बागवेने ‘द व्हिजिटर’ सीरीजबद्दल चाहत्यांसोबत माहिती शेअर केली आहे. सीरीजनिमित्त नक्षत्र बागवेने नवराष्ट्र डिजीटलसोबत संवाद साधला. यावेळी अभिनेत्याने आपल्या वेबसीरीजबद्दल दिलखुलास चर्चा केली.
आपल्या वेबसीरीजमुळे चर्चेत राहिलेला नक्षत्र बागवे कोण आहे, जाणून घेऊया… “मुळचा कोकणस्थ असलेला नक्षत्र बागवे राहायला मुंबई आणि पुण्यात आहे. मी माझ्या घरी वयाच्या १७ व्या आणि १८ व्या वर्षाचा असताना समलैंगिक (Gay) असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर अनेकवर्ष माझ्यासोबत घरच्यांचे सतत वादवैगेरे चालू होते. मी वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्यांदा सीरीज बनवली होती, जिचं नाव होतं लाँगिंग आऊट (Logging Out). मी ती शॉर्टफिल्म माझ्या दु:खातून सावरण्यासाठी आणि माझा विंरगुळा व्हावा म्हणून मी बनवली होती आणि त्यानंतर मी आजवर तब्बल ३० पेक्षा जास्त शॉर्टफिल्म्स बनवल्या आहेत. माझ्या पहिल्याच शॉर्टफिल्मला डेब्यूसाठी पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून ते आजवर मी केव्हाच मागे वळून पाहिले नाही.”
‘डब्बा कार्टेल’चा टीझर प्रदर्शित; साई ताम्हणकर, ज्योतिकासह शबाना आझमी दिसणार मुख्य भूमिकेत!
“मुख्य म्हणजे मी या सर्व शॉर्टफिल्म्स LGBTQ समाजासाठी बनवल्या होत्या. माझ्या शॉर्टफिल्म्सच्या चर्चा फक्त भारतातच नाही तर, जगभरात होत असतात. माझ्या अनेक शॉर्टफिल्म्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेल्या आहेत. त्यांचं तिथे कौतुकही झालं आहे, त्यासोबतच त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे. मी LGBTQ समाजाच्या हक्कासाठी काम केलं आहे आणि अजूनही त्यांच्यासाठी मी काम करतो. मला माझ्या त्या कामासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यासोबत मी भारतातला पहिला ‘समलैंगिक ब्रँड ॲम्बेसिडर’ही आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून LGBTQ समाजासाठी काम करतोय.”