"मी जिथे शिकायला गेलो तिथून हाकललं, कारण…", प्रतीक पाटीलने सांगितली आपबिती; कारण सांगत केला खुलासा
बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमधील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. तिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याच्या जोरावर विशेष चाहतावर्ग तयार केला आहे. आपल्या आईच्या पाऊलावर पाऊल टाकत अभिनेता प्रतीक बब्बरने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. अभिनयाबरोबरच एक प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्या आयुष्यातील घटना आणि त्याच्या वाईट काळाबद्दल प्रतीकने आजवर मुलाखतीच्या माध्यमातून भरभरून भाष्य केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याला लागलेल्या ड्रग्सच्या व्यसनावर भाष्य केले. त्याला व्यसन कधी लागलं आणि त्यामागील काय कारण होतं, याचा मुलाखतीतून खुलासा केला.
हे देखील वाचा- फिल्म इंडस्ट्री सोडणाऱ्या किरण मानेला ‘या’ अभिनेत्याने दिली होती कठीण काळात साथ
‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत प्रतीक बब्बरने सांगितले की,, “लोकांना माझ्याबद्दल वाटतं की हा चित्रपटात आला, प्रसिद्धी आणि पैसा मिळवल्यानंतर ड्रग्स घेऊ लागला. पण, तसे नाही. खरतंर मी तेरा वर्षांचा असताना ड्रग्सचा वापर सुरू केला होता. मी घाबरलो होतो. दुर्दैवाने माझे संगोपन वेगळ्या पद्धतीने झालं आणि माझी कौटुंबिक परिस्थिती थोडी कठीण होती. म्हणून मी ड्रग्स सेवनाला सुरुवात केली. चित्रपटातील पैसा आणि प्रसिद्धी मला या दिशेनं घेऊन गेला नाही. ड्रग्जचं कनेक्शन ट्रॉमाबरोबर असतं आणि त्याचा त्रास मला पुढेही देत राहणार. मग ते माझं व्यावसायिक आयुष्य असो किंवा वैयक्तिक आयुष्य असो, याचा परिणाम मला होणारच होता.”
“जो पर्यंत ट्रॉमा तुमच्या डोक्यातून जात नाही, तोपर्यंत त्याचा परिणाम तुमच्या नात्यांवर आणि आयुष्यातील इतर गोष्टींवर होत राहणार. पण एक वेळ अशी येते तेव्हा तुम्हाला गोष्टी चांगल्या ठेवण्यासाठी स्वत:वर काम करावं लागतं. मी हेच गेल्या काही वर्षांपासून करतोय. यात माझी होणारी पत्नी खूप मदत करतेय”, असं प्रतीकने मुलाखतीत स्पष्ट केलं. प्रतीकच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं तर, स्मिता यांच्या मृत्यूनंतर प्रतीकचा सांभाळ स्मिता यांच्या आई-वडिलांनी केला.
स्मिता यांच्या निधनानंतर राज बब्बर त्यांच्या पहिल्या बायकोकडे परत निघून गेले. या काळात त्यांनी प्रतिककडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे त्या दोघांचं नातं बराच काळ ठीक नव्हतं पण नंतर हे नातं सुधारलं. प्रतीक त्याच्या आजीलाच आई मानायचा. त्यामुळे त्यांच्या निधनाचाही परिणाम त्याच्यावर खूप झाला होता. प्रतीकने गेल्या काही दिवसांपूर्वीच त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जी हिच्यासोबत साखरपुडा केला. तो लवकरच सलमानच्या आगामी ‘सिकंदर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.