ट्रीपल रोलमध्ये रामचरण, तर कियारा अडवाणी हटके भूमिकेत; Game Changer चा ढासू टीझर पाहिलात का ?
चाहते ज्या क्षणाची गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते, अखेर तो क्षण आलेला आहे. रामचरण आणि कियारा अडवाणी स्टारर बहुचर्चित ‘गेम चेंजर’ चित्रपटाचा टीझर अखेर रिलीज झालेला आहे. चित्रपटाची गेल्या दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. पोस्टरपासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता पाहायला मिळाली. येत्या नवीन वर्षात म्हणजेच १० जानेवारी २०२५ मध्ये चित्रपट रिलीज होणार असून लखनऊमध्ये, चित्रपटाचा टीझर लाँचिंग इव्हेंट निर्मात्यांनी ठेवला होता. अफलातून ॲक्शन आणि जबरदस्त सीन्सने प्रेक्षकांचे लक्ष टीझरने वेधले आहे.
निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज केलेला आहे. अवघ्या काही तासांतच टीझरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. टीझरमध्ये प्रेक्षकांना रामचरणच्या वेगवेगळ्या अंदाजाने आणि कियारा अडवाणीच्या दिलखेचक अदांनी लक्ष वेधले आहे. दोघांनीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. कायमच आपल्या दमदार ॲक्शनने प्रेक्षकांचे लक्ष वेधणारा रामचरण चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीही दिसून येणार आहे. शिवाय रामचरण कियारासोबत रोमान्सही करणार आहे.
गेम चेंजरमध्ये, राम चरण एका आयएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. सुरळीत निवडणुका पार पाडण्यासाठी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांपासून लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचे कथानक कार्तिक सुब्बाराव यांनी लिहिले असून एस यू वेंकटेशन आणि विवेक यांची कथा आहे. दिल राजू आणि सिरिश चित्रपटाची निर्माती केली असून शिवाजी द बॉस फेम शंकर सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, चित्रपटाचे संगीत थमन एस यांनी दिले आहे. कियारा आणि रामचरण व्यतिरिक्त चित्रपटात अंजली, समुथिराकणी, एसजे सूर्या, श्रीकांत, प्रकाश राज आणि सुनील देखील दिसणार आहेत. ‘गेम चेंजर’ सर्व दक्षिण भारतीय भाषा आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे.
हे देखील वाचा – अर्चना पूरण सिंग संतापली! कपिल शर्माच्या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धूचे पुनरागमन?