फोटो सौजन्य - Social Media
सध्या झी मराठीवर दोन मालिकांच्या प्रोमोने फार हंगामा केला होता. त्यातील एक मालिका होती ‘कमळी’ तर दुसरी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे स्टारर मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’! दरम्यान, या मालिकेच्या चर्चा मालिकाविश्वात फार आहे. मोठ्या प्रमाणात प्रेक्षक या मालिकेकडे केवळ प्रोमो पाहून आकर्षित झाले आहेत. दरम्यान, या मालिकेत स्वानंदीचा भाऊ म्हणून अभिनेता राज मोरे भूमिका साकारत आहे. यंदा काम करताना त्याला आलेला अनुभव त्याने चाहत्यांशी शेअर केला आहे.
अभिनेता राज मोरे या आधी ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत दिसून आला होता. दरम्यान, ही मालिका Off Air गेली होती. सुरुच्या नवरीची भूमिका त्याने साकारलेली असून AJ चा लहान पुतण्या म्हणून तो पात्र सांभाळत होता. ही मालिका फार चर्चेत आली होती. ही मालिका अभिनेत्याचा TV डेब्यूट असून त्याला हे पात्र मिळताच त्याच्या आईला आलेल्या आनंदाश्रूबद्दल त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. राज आता ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेमध्ये स्वानंदी (अभिनेत्री तेजश्री प्रधान)च्या भावाचे पात्र रोहन सरपोतदार ही भूमिका साकारत आहे.
राज रोहन म्हणून एका मध्यम वर्गीय मुलाचे पात्र सांभाळत असून समर ( अभिनेता सुबोध भावे )ला त्याच्या बहिणीच्या रोहनसोबत असलेल्या नात्याविषयी सांगून स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याची जबाबदारी साकारत आहे. अशामध्ये अभिनयादरम्यान येणारा अनुभव त्याने चाहत्यांना शेअर केला आहे.
राज म्हणाला होता की,”माझा आणि तेजश्रीचा पहिलाच सीन होता. त्यावेळी मला फार दडपण आले होते. त्याबद्दल मी तेजश्रीला सांगितले असता तिने मला एखाद्या सिनिअर कलाकारांबरोबर काम करताना दडपण येणे साहजिक असल्याचे सांगून माझे धैर्य वाढवले.” राजचे म्हणणे होते की काही वेळ त्यांनी संवाद साधला आणि त्या दोघांचे नाते फार फुलून आले आणि दोघांमध्ये छान गट्टी जमली. संपूर्ण चाहतवर्गाचे लक्ष या मालिकेच्या भविष्यातील कामगिरीवर आहे.