Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सचिन पिळगांवकर करणार प्रस्तुती क्षेत्रात पदार्पण, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पहिल्या वहिल्या चित्रपटाची घोषणा

अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये अभिनय, दिग्दर्शन आणि गायन अशी पाच दशकांपेक्षा अधिक बहुरंगी कारकिर्द गाजवणारे सचिन पिळगांवकर आता नव्या वर्षात निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 03, 2025 | 01:46 PM
सचिन पिळगांवकर करणार प्रस्तुती क्षेत्रात पदार्पण, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पहिल्या वहिल्या चित्रपटाची घोषणा

सचिन पिळगांवकर करणार प्रस्तुती क्षेत्रात पदार्पण, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पहिल्या वहिल्या चित्रपटाची घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये अभिनय, चित्रपटांचे दिग्दर्शन, गायन अशी पाच दशकांपेक्षा अधिक मोठी, बहुरंगी कारकिर्द गाजवणारे सचिन पिळगांवकर आता नव्या वर्षात नवी इनिंग सुरू करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या धुन प्रॉडक्शन निर्मित आणि जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित “स्थळ” या बहुचर्चित चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिळगांवकर करणार असून, महिला दिनाच्या औचित्याने ७ मार्चला “स्थळ” हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Kumar Vishwas: सैफ-करिनाच्या मुलाचे नाव घेऊन का संतापले कुमार विश्वास? सोशल मीडियावर सुरु झाली चर्चा!

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त “स्थळ” चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा आणि जयंत दिगंबर सोमलकर यांनी “स्थळ” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग ढवस, संदीप सोमलकर, संदीप पारखी, स्वाती उलमले, गौरी बदकी, मानसी पवार या नव्या दमाच्या कलाकारांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

 

दिग्दर्शक जयंत दिगंबर सोमलकर यांनी शॉर्ट फिल्म्ससह ‘गिल्टी माईंड्स’ या गाजलेल्या वेब सीरिजचं सहदिग्दर्शन केलं होतं. “स्थळ” हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला आणि तिथे त्याला सर्वश्रेष्ठ आशिया पॅसिफिक फिल्मसाठी NETPAC अवॉर्ड सुद्धा मिळाला. त्यानंतर तब्बल २९ महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला गेला आहे आणि १६ पेक्षा जास्त पुरस्कारही पटकावले आहेत. त्यामुळेच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे.

मॅडॉक फिल्म्सने हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सच्या ८ चित्रपटांची केली घोषणा, Bhediya 2 आणि Stree 3 केव्हा येणार ?

सर्वप्रथम श्रियाने मामी फेस्टिवल मध्ये हा चित्रपट पाहिले होता. ख़ास श्रियाच्या आग्रहास्तव अमेरिकेत “नाफा” फिल्म फेस्टिवल मध्ये मी आणि सुप्रियाने “स्थळ” हा चित्रपट पाहिला. त्यावेळीच हा चित्रपट आम्हा दोघांनाही प्रचंड आवडला होता.महाराष्ट्रातील मातीत रूजलेल्या या चित्रपटाला अमेरिकेच्या मराठी लोकांनी डोक्यावर घेतलेले पाहून, चित्रपट प्रदर्शित करताना काही मदत लागल्यास आवर्जून सांगा असे निर्माता, दिग्दर्शक जयंत सोमलकर यांना आम्ही सांगितले. “स्थळ” चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी मला चित्रपटाची प्रस्तुती करण्यास विचारले आणि मी लगेच होकर दिला. चांगली संहिता ही रसिक प्रेक्षकांपर्यंत अवश्य पोहचली पाहिजे यासाठी मी या चित्रपटाची प्रस्तुती करण्याचे ठरविले असे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर यांनी सांगितले.

Web Title: Actor sachin pilgaonkar debut as a producer coming soon released at sthal marathi movie released date and poster released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 12:37 PM

Topics:  

  • marathi film
  • sachin pilgaonkar

संबंधित बातम्या

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!
1

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!

गैरसमज की सत्य? सचिन पिळगावकरांची दत्तक मुलगी कोण? ‘किडनॅपिंगचा आरोप…’
2

गैरसमज की सत्य? सचिन पिळगावकरांची दत्तक मुलगी कोण? ‘किडनॅपिंगचा आरोप…’

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!
3

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित
4

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.