शिव ठाकरेचा खतरनाक लूक पाहिलात का ?
अभिनेता शिव ठाकरे याला आज कोणत्याचं वेगळ्या ओळखीची गरज नाही. ‘बिग बॉस मराठी ३’, ‘बिग बॉस १६’ आणि ‘एमटीव्ही रोडिज’ सारख्या कार्यक्रमांमधून शिव ठाकरे विशेष प्रसिद्धीत आलाय. कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारा शिव सध्या त्याच्या नव्या लूक मुळे चर्चेत आला आहे. नुकताच शिव ठाकरेने इन्स्टाग्रामवर एकदम रावडी लूक चाहत्यांसोबत शेअर केलेला आहे.
कायमच आपल्या जबरदस्त शरीरयष्टीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिव ठाकरेने काही तासांपूर्वीच एक रावडी लूक चाहत्यांसोबत शेअर केलेला आहे. नेमका हा लूक त्याच्या आगामी चित्रपटातला आहे की, खास फोटोशूट आहे, याबद्दलची कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण शिव ठाकरेच्या ह्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधलेय. नजरेत राग, दमदार शरीरयष्टी आणि दमदार असा लूक अभिनेत्याने शेअर केलेला आहे. त्याच्या ह्या फोटोंवर सारेच फिदा झाले आहेत.
“उत्कंठावर्धक आणि मनमोहक लूक, तुम्ही लूकसोबत सहमत आहात का?” असं कॅप्शन देत शिवने हे नवीन फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केलेले आहेत. शिव ठाकरेचे हे फोटोज् सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे. काही तासांतच शिवच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे. “हिरो तर व्हिलन झाला”, “अंगार”, “फ्लावर समझा क्या, फायर है अपून”, “शिवा भाई व्हिलन” अशा एक ना अनेक कमेंट्स शिव ठाकरेच्या फोटोंवर चाहत्यांकडून करण्यात आलेल्या आहेत.
शिव ठाकरेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, ‘बिग बॉस सीझन १६’, ‘खतरों के खिलाडी सीझन १३’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शिव अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला आहे. इतकी प्रसिद्धी मिळाल्यानंतरही त्याचे पाय जमिनीवर आहेत. त्याच्या स्वभावातील याच साधेपणामुळे आणि चाहत्यांशी प्रेमाने वागण्याच्या सवयीमुळे तो दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे.