अनेक, बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर अनेक दिवसांनंतर पाहायला मिळतात. बहुतेक स्टार्स आपल्या मुलांना वर्षभर सोशल मीडियापासून दूर ठेवतात. अनुष्कानेही तेच पाऊल उचलले होते. त्यानंतर आता दीपिकाही तोच नियम पाळण्याची शक्यता आहे.
Deepika- Ranveer Welcome Their First Baby On This Date : बॉलिवूडमधील सर्वाधिक फेव्हरेट कपलमध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण. कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारं हे कपल. लवकरच अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह आई- बाबा होणार आहेत. त्यामुळे दोघांचाही आनंद काही केल्या गगनात मावेनासा झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दीपिका लंडनमध्ये आपल्या बाळाला जन्म देणार, अशी चर्चा सुरु होती. पण त्यानंतर ती मुंबईमध्येच आपल्या पहिल्या बाळाला जन्म दीपिका देणार असल्याचं स्पष्ट झालं. अशातच आता दीपिका आपल्या बाळाला केव्हा जन्म देणार ? ही तारीख समोर आली आहे.
हे देखील वाचा – “निक्कीशिवाय तुझा गेम नाही”, ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुख घेणार आर्याची शाळा
दरम्यान, दीपिकाने फेब्रुवारी महिन्यात इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत प्रेग्नेंट असल्याची माहिती दिली. यासोबतच तिनेच सप्टेंबर महिन्यातच बाळाला जन्म देणार असं सांगितलं होतं. त्यानंतर इन्स्टाग्रामवर दीपिकाचे बेबी बंपमध्ये अनेक व्हिडिओही व्हायरल झाले होते. त्यासोबतच ती अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल सुद्धा झाली होती. अखेर सप्टेंबर महिन्यात रणवीर- दीपिका आई- बाबा होणार असून मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयातच बाळाला जन्म देणार आहे. पादुकोण आणि सिंह परिवार ज्या दिवसाची वाट पाहत होते. म्हणजेच, दीपिकाची डिलेव्हरीची तारीख समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री दीपिका पादुकोण आपल्या पहिल्या बाळाला मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात जन्म देणार आहे. दीपिका आणि रणवीरच्या एका जवळच्या व्यक्तीनेच अभिनेत्रीच्या डिलेव्हरीची तारीख सांगितली आहे. दीपिका- रणवीर आता लवकरच एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. सध्या अभिनेत्री प्रग्नेंसीचा काळ एन्जॉय करीत आहे. कोणत्याही गोष्टीची कसर न सोडता अभिनेत्री प्रेग्नेंसीचा काळ एन्जॉय करीत आहे. ठरल्याप्रमाणे गोष्टी झाल्यास दीपिका २८ सप्टेंबरला गोंडस बाळाला जन्म देऊ शकते.
हे देखील वाचा – अरबाजला रितेश देशमुखचा दणका, उघडणार का घरच्यांचे डोळे
दीपिका आणि रणवीरच्या जवळच्या एका विश्वसनीय व्यक्तीने न्यूज १८ ला माहिती दिली आहे. दरम्यान, दीपिका पादुकोणने २०१८ मध्ये रणवीर सिंगसोबत लग्न केले होते. हे कपल सर्वांचेच आवडते कपल आहे. या कपलची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. ‘गोलियों की रासलीलाः रामलीला’ या चित्रपटाच्या सेटवर या दोघांची भेट झाली. त्याचवेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी या दोघांनी लग्न केले. या दोघांनी ‘गोलियों की रासलीलाः रामलीला’ या चित्रपटानंतर, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ’83’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले. त्यांचे हे चित्रपट सुपरहिट देखील ठरले.