"हे तर देशाचे हनुमान..." अभिनेता वरुण धवन गृहमंत्री अमित शाह यांना असं का म्हणाला ?
अभिनेता वरुण धवनचा येत्या २५ डिसेंबरला ‘बेबी जॉन’ चित्रपट रिलीज होणार आहे. जबरदस्त ॲक्शन, बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी आणि कॉमेडीची मेजवानी असणाऱ्या ह्या चित्रपटामध्ये वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या अभिनेता वरुण धवन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशन दरम्यान अभिनेता वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसत आहे. अशातच अभिनेत्याने आज तकला मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान अभिनेत्याने गृहमंत्री अमित शाह यांना देशाचे हनुमान अशी उपमा दिली आहे.
नुकतंच अभिनेता वरुण धवनने आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ‘आज तक’च्या एका इव्हेंटला उपस्थिती लावली होती. गृहमंत्री अमित शाह यांची स्टेजवर मुलाखत सुरू होती आणि वरुण धवन खाली प्रेक्षकांमध्ये बसला होता. चर्चा सत्रादरम्यान अभिनेत्याने गृहमंत्र्यांना अगदी एका पत्रकाराप्रमाणेच काही प्रश्न विचारले. अभिनेत्याने विचारलेल्या प्रश्नावर गृहमंत्री अमित शाह यांनी दिलखुलास आणि मजेशीर उत्तर दिली. सध्या दोघांच्याही चर्चेदरम्यानचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे.
Varun Dhawan praises HM Shah, HM Shah calls him a talented guy….
And that answer by HM Shah was really beautiful… pic.twitter.com/ubXUN09lxy
— Mr Sinha (@MrSinha_) December 14, 2024
होस्ट गृहमंत्र्यांना म्हणतात, कायम लोकं वरुणला प्रश्न विचारतात. आज वरुण तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तितक्यात गृहमंत्री अमित शाह म्हणतात, “वरुण तू सुद्धा यांच्यासारखा पत्रकार होऊ नको” यावर वरुण लगेच म्हणतो, “नाही, सर…” अभिनेता म्हणतो, “सर, तुम्ही आज जे काही सांगितलंत ते ऐकून मी प्रभावित झालो आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. “प्रभु श्री राम आणि रावण या दोघांमध्ये सर्वात मोठा फरक काय आहे ?” ” अभिनेत्याच्या प्रश्नावर गृहमंत्र्यांनी उत्तर दिले की, “काही लोकं धर्माला स्वत:ची जबाबदारी मानत काम करतात, तर काही लोकं स्वत:च्या फायद्यासाठी धर्माचा वापर करुन घेतात. हाच प्रभु श्री राम आणि रावण या दोघांमधला सर्वात मोठा फरक आहे. प्रभु श्री राम धर्माच्या आधारे जगले तर, रावणाने धर्माला आपल्या मर्जीने बदलण्याचा प्रयत्न केला.”
गायिका उषा मंगेशकर गायिका नसत्या तर काय झाल्या असत्या ? एका गाण्याने रातोरात चमकलेलं नशीब
पुढे वरुण म्हणाला की, “तुम्ही मगाशी अहंकारावर म्हणाले, तर माझ्या मनात असा विचार आला होता की रावणाला त्याच्या ज्ञानाचा अहंकार आहे तर प्रभु श्री रामांना अहंकाराचं ज्ञान आहे.” यावर अमित शाह म्हणतात, “दोन्हीही अहंकाराच्या व्याख्या धर्मामध्येच येतात.” पुन्हा वरुण म्हणतो, “मी आजवर तुम्हाला टीव्हीवरच पाहत आलोय. आयुष्यात आज पहिल्यांदाच मी तुम्हाला समोरासमोर लाईव्ह बघतोय. काही लोक तुमचा उल्लेख राजकारणातले चाणक्य असता करतात. पण मी सांगू इच्छितो की देशाचे हनुमान आहात जे कोणताही स्वार्थ न बाळगता देशसेवा करत आहेत. जितक्या स्पष्टपणे ते आपले विचार मांडतात हे आम्ही कलाकार सुद्धा स्क्रीप्ट वाचून बोलू शकत नाही.” अभिनेत्याच्या विधानाचे अनेक युजर्स सध्या सोशल मीडियावर जोरदार कौतुक करीत आहेत.
करणवीर-चुम दारंग यांच्या नात्याचा शेवट! घरात पाहायला मिळणार नवा लव्ह अँगल
‘बेबी जॉन’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत वरुण धवन, कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ आणि राजपाल यादव आहेत. मुराद खेतानी, प्रिया अटली आणि ज्योती देशपांडे निर्मित, ‘बेबी जॉन’ हा एक मोठा सिनेमॅटिक अनुभव आहे जो तुम्ही चुकवू शकत नाही. कॅलिस दिग्दर्शित हा चित्रपट 25 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.