Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रश्मिका-विजयने लग्नाच्या एकदिवस आधी घेतली अमित शाहांची भेट; गृहमंत्र्यांना भेटवस्तू देऊन केलं आमंत्रित

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी नुकतेच लग्न केले आहे. दरम्यान, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांचा एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटताना दिसत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 27, 2026 | 10:59 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • रश्मिका-विजय अडकले लग्न बंधनात
  • गृहमंत्र्यांना भेटवस्तू देऊन केलं आमंत्रित
  • विजय आणि रश्मिकावर कौतुकाचा वर्षाव
दक्षिण भारतीय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांचा नुकताच २६ फेब्रुवारी रोजी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. लोक या जोडप्याचे अभिनंदन करताना दिसत आहेत. या सगळ्या दरम्यान, विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांचा एक नवीन फोटो समोर आला आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना देखील दिसत आहेत.

The Kerala Story 2 आज होणार नाही प्रदर्शित? अ‍ॅडव्हान्स बुकिंगनंतर कोर्टाचा १५ दिवसांचा स्थगिती आदेश

रश्मिका आणि विजय यांनी अमित शहा यांची घेतली भेट

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांचा नुकताच व्हायरल होत असलेला फोटो. या फोटोमध्ये विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना लग्नाच्या रिसेप्शनचे आमंत्रण देताना दिसत आहेत. एका सुंदर पेटीत गणपतीची चांदीची मूर्ती ठेवली आहे. या फोटोत रश्मिका खूपच सुंदर दिसत आहे. तिने पिवळ्या रंगाचा सूट आणि साधा मेकअप केला आहे. विजयने आयव्हरी रंगाचा इंडो-वेस्टर्न सूट घातला होता. या फोटोत विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना खूप आनंदी देखील दिसत होते. लोक विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या जोडप्याच्या या फोटोने चाहत्यांच्या मनावर कब्जा केला आहे. रिपोर्ट्सनुसार, रिसेप्शन पार्टी १ मार्च रोजी होणार आहे.

विजय आणि रश्मिकाचा शाही विवाह सोहळा

अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना या दोघेही गुरुवारी उदयपूर येथे विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर येताच चाहत्यांनी त्यांची तुलना पौराणिक महाकाव्यांतील प्रसंगांशी करण्यास सुरुवात केली आहे. केवळ जवळचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या खासगी सोहळ्यानंतर नवविवाहित जोडप्याने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. जे पाहून चाहते चकीत झाले, तसेच त्यांच्या सगळ्या फोटोवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. रश्मिका पारंपरिक लाल साडी आणि पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांमध्ये दिसली. तर विजयने ऑफ-व्हाईट धोतर, सोन्याचे दागिने आणि लाल शाल परिधान केली होती.

The Kerala Story 2 आज होणार नाही प्रदर्शित? अ‍ॅडव्हान्स बुकिंगनंतर कोर्टाचा १५ दिवसांचा स्थगिती आदेश

दोघांचेही दीर्घकालीन प्रेमसंबंध

विजय देवेराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना लग्नापूर्वी बराच काळ एकमेकांना डेट करत होते.परंतु, या जोडप्याने कधीही त्यांच्या नात्याचे कोणतेही फोटो शेअर केले नाहीत. विजय देवेरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या लग्नाची माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. विजय देवेरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या लग्नाचे फोटो पाहून चाहते खूप खुश झाले आहेत.

Web Title: Rashmika and vijay meet amit shah immediately after their wedding inviting the home minister with a gift

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • Amit Shah
  • Bollywood
  • entertainment
  • rashmika mandanna

संबंधित बातम्या

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन
1

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन

Rashmika Mandanna Mysaa Movie: चेहऱ्यावर रक्त अन् नजरेत..; रश्मिका मंदानाचा आजवरचा सर्वात रौद्र अवतार!
2

Rashmika Mandanna Mysaa Movie: चेहऱ्यावर रक्त अन् नजरेत..; रश्मिका मंदानाचा आजवरचा सर्वात रौद्र अवतार!

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम
3

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?
4

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.