'पुष्पा २'च्या प्रीमिअरदरम्यान चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेच्या मुलाची तब्येत सध्या कशी? डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट
त्या जखमी मुलावर हैद्राबादच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तो रुग्णालयातच आहे, त्याच्या हेल्थबद्दल आता महत्वाची अपडेट समोर आली आहे. ८ वर्षीय मुलगा श्री तेजा याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे. काही वेळापूर्वीच डॉक्टरांनी त्याच्या हेल्थबद्दल माहिती दिली आहे.
द हिंदूने दिलेल्या माहितीनुसार आणि हॉस्पिटलमधून ८ वर्षीय मुलाची हेल्थ अपडेट दिलेल्या माहितीनुसार, “रेवती यांचा ८ वर्षीय मुलगा श्री तेजा याला सारखा सारखा ताप येत आहे. गेल्या १० दिवसांपासून त्याच्या तब्येतीत कोणताही फरक जाणवत नाही. पीड्रियाटिक इंटेन्सिनव्ह केअर युनिट (Pediatric Intensive Care Unit)मध्ये त्याच्यावर व्हेंटिलेटरच्या आधारावर त्याच्यावर उपचार सुरू आहे. रेवती यांचा ८ वर्षीय मुलगा श्री तेजा याला सिंकदराबादच्या KIMS कडल्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हेमोडायनामिक रुपात तो स्थिर आहे मात्र त्याला ट्यूब फीडिंग करावं लागत आहे. थांबत थांबत त्याला सतत ताप येतोय. सध्या त्याची तब्येत चिंताजनक आहे.”
दरम्यान, रेवती यांचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झाला असून त्यांच्या मुलाचा गर्दीमध्ये गुदमरून मृत्यू झाला आहे. चित्रपटाच्या रिलीजच्या आदल्यादिवशी ‘पुष्पा २’चा हैद्राबादमध्ये प्रीमियर होता. प्रीमियरवेळी थिएटरमध्येही आणि थिएटरच्या बाहेरही अभिनेत्याीच्या फॅन्सची एकच तुडूंब गर्दी होती. आपल्या आवडत्या कलाकाराचा चित्रपट रिलीज होणार म्हटल्यावर चाहत्यांचा एकच जोरदार जल्लोष होता. प्रीमियरसाठी अल्लू अर्जुन येणार असल्याची चाहत्यांना माहिती मिळताच आणखीनच चाहत्यांची गर्दी जमा झाली. गर्दी प्रमाणाबाहेर गेल्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली. हैद्राबादची रहिवासी असलेल्या ३९ वर्षीय रेवती आपल्या पतीसोबत ८ वर्षांचा मुलगा श्री तेजा आणि ७ वर्षांची मुलगी सान्विकाही प्रीमियरवेळी उपस्थित होती.
प्रीमियर दरम्यान, थिएटरमध्ये अल्लू अर्जुनची एन्ट्री झाली. बाहेरील लोकांनी आतमध्ये येण्यासाठी धक्काबुक्की केली. त्याच दरम्यान रेवती आणि त्यांचा मुलगा गुदमरुन बेशुद्ध झाले. ८ वर्षांचा मुलगा गर्दीत अक्षरश: दबला गेला होता. पोलिसांची त्याच्यावर नजर पडली. तातडीने रेवती आणि मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. रेवती यांचा तोपर्यंत मृत्यू झाला होता, तर मुलावर अद्यापही उपचार सुरू आहेत. ‘पुष्पा २’ च्या प्रीमियर दरम्यान ४ डिसेंबर रोजी संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी हैद्राबाद पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुनला १३ डिसेंबर रोजी अटक केली होती. मात्र, तेलंगणा उच्च न्यायालयाने अभिनेत्याची १४ दिवसांच्या जामिनावर अभिनेत्याची सुटका केली. याआधी अल्लू अर्जुनने पीडितेच्या कुटुंबाला मदत म्हणून २५ लाख रुपये दिले होते.
तुरुंगातून सुटका झाली तरीही अल्लू अर्जुनला एक रात्र तुरुंगात काढावी लागली. तर दुसरीकडे दिवंगत रेवती यांच्या पतीने अल्लू अर्जुनविरोधात कोणतीही तक्रार नाही असे स्पष्ट केले. तसंच अल्लू अर्जुनने पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.