Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 5 : “आपला पॅडी का रडला?”, प्रश्नाचं उत्तर देत विशाखा सुभेदारने सांगितला पंढरीनाथ कांबळेचा ‘तो’ किस्सा

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना उकडलेलं अन्न खायला मिळत आहे. उकडलेलं अन्न देण्यामागचं कारण म्हणजे, अनेकदा काही स्पर्धकांनी अन्न वाया घालवलं होतं, त्यासोबतच काहींनी अन्नाचा त्यागही केला होता. परिस्थितीची जाणीव म्हणून बिग बॉसने स्पर्धकांना ही शिक्षा दिली आहे. बिग बॉसचे हे शब्द पॅडी कांबळेच्या डोळ्यात अश्रु आले.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 14, 2024 | 07:33 PM
Bigg Boss Marathi 5 : “आपला पॅडी का रडला?”, प्रश्नाचं उत्तर देत विशाखा सुभेदारने सांगितला पंढरीनाथ कांबळेचा ‘तो’ किस्सा
Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना उकडलेलं अन्न खायला मिळत आहे. उकडलेलं अन्न देण्यामागचं कारण म्हणजे, अनेकदा काही स्पर्धकांनी अन्न वाया घालवलं होतं, त्यासोबतच काहींनी अन्नाचा त्यागही केला होता. त्यामुळे सर्वांनाच शिक्षा म्हणून उकडलेलं अन्न दिलं जात होतं. त्यासोबतच आणखी एक कारण म्हणजे, अन्न ही मूलभूत गरज आहे. पण आजही महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पुरेसं अन्न न मिळाल्याने लोकांना फक्त पाणी पिऊन झोपावं लागतं आहे. परिस्थितीची जाणीव म्हणून बिग बॉसने स्पर्धकांना ही शिक्षा दिली आहे. बिग बॉसचे हे शब्द पॅडी कांबळेच्या डोळ्यात अश्रु आले.

हे देखील वापरा – घरातील अन्नाची नासाडी केल्याने बिग बॉसने दिली ‘ही’ कठोर शिक्षा

दरम्यान, अभिनेत्याचा हाच व्हिडिओ इन्स्टाग्रामला शेअर करत अभिनेत्री विशाखा सुभेदारने एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने पॅडी कांबळेच्या सोबतचा एक किस्साही पोस्टच्या माध्यमातून सांगितला आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदारने पंढरीनाथ कांबळेचा भावूक होतानाचा व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली की, “आपला पॅडी का रडला? खरं सांगू का…यातला हा माणूस त्याच्या जवळच्या अनेक मित्र मंडळींनी पाहिलाय…अत्यंत प्रामाणिक आणि भावनाप्रधान, मदत करणारा, दयाशील असा आमचा पॅडी…पंढरीनाथ. दयाशील असा आमचा पॅडी… पंढरीनाथ. एक किस्सा आठवला..असंच आम्ही प्रयोगाला जात होतों,रस्ता चुकला म्हणून बस थांब्यावर असलेल्या एका बाईला रस्ता विचारला, तर तिने रस्ता सांगताना अरे तुम्ही तर माझ्याच घरावरून जाणार, माझ्या घरावरून पुढे गेलात ना की मग डावीकडे वळलं की मग पुढे थोडं उजवीकडे वळले की तुमचा ठिकाणी.. असं म्हणाली.”

 

“त्यावर पॅडी म्हणाला कीं अहो काकी तुमचं घर आम्हाला कुठे माहिती आहे… हसलो..त्यावर तीने हसून पुन्हा एकदा रस्ता सांगितला.. आणि आणि आम्ही थोडं पुढे गेलो.. त्यांनी मध्येच गाडी थांबवायला सांगितली.. मला म्हणाला अगं आपण त्या बाईच्या घरावरनं जाणार मग आपण तिला का घेतलं गाडीत?? आम्ही मागे गेलो आणि त्या बाईला त्यांनी गाडीत बसवलं.. संपूर्ण प्रवासात आमच्या गप्पा चालल्या होत्या तिचा नवरा त्यांची मासेमारी ची बोट त्यावरचे कामगार सगळं .. तिने काही आम्हा दोघांना ओळखलं नव्हतं.. तिच आपल दर काही वाक्यानंतर चालू होतं” बाई पहिल्यांदा एवढ्या मोठ्या गाडीत बसले…” कधीच नाही बसले ग गाडीत.. नुसत्या गाड्या तोंडासमोरून गाड्या जायच्या,बसले कधीच नव्हते आज पहिल्यांदा बसले.. ते पण एवढ्या मोठ्या गाडीत..! मग तिला तिच्या घराजवळ उतरवलं.. आणि मग तिला पॅडी ने विचारलं, या बाईला ओळखतेस का तू? मग टीव्ही मध्ये शुभविवाह दुपारची सिरीयल लागते त्यात काम करते रागिनी..”

हे देखील वाचा – रणदीप हुड्डाने सपत्नीक सर्वसामान्यांबरोबर गर्दीतून घेतले लालबागच्या राजाचे दर्शन, नेटकऱ्यांनी अभिनेत्याच्या साधेपणाचे केले कौतुक

“हे सांगितल्यावर तिने ओळखलं.. साडीत वेगळ्या दिसता तुम्ही… भूमी आकाश रागिणी वांली सिरीयल.. मी तर गाडीच्या नादात होते तुमच्याकडे तस निरखून पाहिल नाही…असं म्हणाली..आभार वैगरे मागुन ती निघून गेली.. तिचा आनंद पाहून पॅडी ला आनंद होत होता,आपल्या आईला सोडल असं feel होत होतं.. त्यानंतर पुढच्या प्रवासात आम्ही दोघ ही अबोल .. त्यांन त्याच्या आईला आणि मी माझ्या बापाला कवटाळून प्रवास केला… अ सा आहे.. पॅडी! दुसऱ्याच्या सुखदुःखात साथ देणारा.. त्याची शिकवण्याची पद्धत अशीच आहे.. थोडी टोमणे मारत मारत पण एकदा का गाठ बसली कीं कायमची.. त्याचे टोमणे बोल अमृताची फळ वाटतात कारण तो फार कमी वेळा तस बोलतो. आणि गरज पडली तरच.. सुरज पहिल्या दिवसापासून बेड वर पॅडी च्या बाजूला झोपला.. त्यावेळी तर त्यांची ओळख ही नव्हती.. हा… आलय? ते पासून त्याची काळजी घेणे त्यात फक्त माया आहे असणार.. त्याच्या वागण्याबोलण्यात कुठला स्वार्थ असता तर तो आज कुठल्याकुठे असता..”

Web Title: Actress vishakha subhedar shared old memories with bigg boss marathi season 5 contestant pandharinath kamble

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 07:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.