घरातील अन्नाची नासाडी केल्याने बिग बॉसने दिली 'ही' कठोर शिक्षा
‘बिग बॉस मराठी’चा खेळ सध्या खूपच रंजक वळणावर जाऊन पोहोचला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच वेगवेगळी नाटकं पाहायला मिळतात. आता घरातील काही सदस्यांनी अन्नाची नासाडी केल्याने बिग बॉसने त्यांना उकडलेलं अन्न खाण्याची शिक्षा दिली आहे. अन्न ही मूलभूत गरज आहे. पण आजही महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पुरेसं अन्न न मिळाल्याने लोकांना फक्त पाणी पिऊन झोपावं लागतं आहे. पण बिग बॉसच्या घरातील काही सदस्य मात्र अन्न वाया घालवताना दिसून आले आहेत.
हे देखील पाहा – हिना खानची महिमा चौधरीसाठी खास पोस्ट, ‘देवदूत’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये अंकिता म्हणतेय,”भूक लागली आहे बिग बॉस”. त्यानंतर बिग बॉस म्हणत आहेत, “आज महाराष्ट्रात एक वेळच्या अन्नासाठी देखील चूल पेटणं शक्य होत नाही. या परिस्थितीची झलक मिळावी म्हणून आपण केवळ उकडलेलं अन्न खा”. पुढे पॅडी दादा म्हणतोय,”उकडलेल्या अन्नाचं इटकं वाटलं नव्हतं बिग बॉस बोलल्यानंतर ते जास्त जाणवतय.” अन्न वाया घालवणाऱ्या सदस्यांना किती दिवस फक्त उकडलेलं अन्न खावं लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बिग बॉस मराठीचा आजचा भाग खूप खास असणार आहे. आजच्या भागात प्रेक्षकांना अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत.
दरम्यान, पहिल्या दिवसांपासून ‘टीम ए’मध्ये असणारी मैत्री आता कायमची तुटली आहे. कॅप्टन्सी टास्कच्या पहिल्या फेरीतच जान्हवीने अरबाजला शर्यतीतून बाद केलेलं आहे. कॅप्टन पदासाठी अरबाज का योग्य नाही ? याचे कारण सांगताना जान्हवी म्हणाली की, “तो खेळताना फार आक्रमकतेने खेळतो. त्याच्यामुळे घरातल्या इतर सदस्यांनाही दुखापत होते. त्यामुळे मला त्याचा गेम अजिबात आवडत नाही. गेल्या काही दिवसांपासून मी त्याचा गेम पाहतेय, मला त्याचा गेम वैयक्तिक आवडला नाही. कारण, मला त्याच्या गेममुळे दुखापत झाली आहे. त्यामुळे मला इतका रागीट आणि आक्रमक घराचा कॅप्टन नको आहे.” टास्कमध्ये पहिल्याच फेरीत बाद केल्याने अरबाज-जान्हवीमध्ये वाद देखील झाले.
हे देखील वाचा – ‘येक नंबर’च्या टिझरमधील ‘तो’ दमदार आवाज नेमका कोणाचा ? वेधलं लक्ष