अभिनेत्री अदा शर्माचा (Adah Sharma) ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story ) हा चित्रपट सर्व वादांना तोंड देत बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 242 कोटींचा व्यवसाय केला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर कमाल करत आहे. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने आता एक नवा टप्पा गाठला आहे.
[read_also content=”स्टाईल फेम अभिनेता साहिल खान दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर, 47 वर्षाच्या साहिलनं 21 वर्षीय तरुणीसोबत बांधली लग्नगाठ! https://www.navarashtra.com/movies/actor-sahil-khan-confirms-second-wedding-with-21-year-old-model-nrps-508746.html”]
‘द केरळ स्टोरी’ OTT वर यशस्वी झाला आहे. OTT वर स्ट्रिमिंगच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी हा चित्रपट 150 दशलक्षाहून अधिक दर्शकांनी पाहिला आहे. ‘द केरळ स्टोरी’ 16 फेब्रुवारी रोजी OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर रिलीज झाला. प्रेक्षकसंख्या पाहता चित्रपटाची कमाई चांगली होत आहे. या यशाने अदा शर्मा आणि द केरळ स्टोरीची टीम उत्साहित आहे.
Setting another milestone with its bold narrative! 150 million watch minutes and counting. ??#TheKeralaStory streaming now, only on #ZEE5#TheKeralaStoryOnZEE5 #VipulAmrutlalShah #TheKeralaStory #SaveOurDaughters@sudiptoSENtlm @Aashin_A_Shah @sunshinepicture @adah_sharma… pic.twitter.com/ukxF58PfZw
— ZEE5 (@ZEE5India) February 19, 2024
चित्रपटात काही हिंदू मुली दाखवण्यात आल्या होत्या. या बहुतेक मुलींचं कथितरित्या धर्मांतर केले गेले आणि नंतर इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेत भरती करण्यात आले आणि त्यांना अफगाणिस्तान आणि सीरिया सारख्या ठिकाणी पाठवण्यात आल्याचं चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. त्यावरुन वाद सुरू झाला होता. सुदीप्तो सेन यांनी या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.