अॅनिमल (Animal) चित्रपटात आपल्या बोल्ड अभिनयाने रातोरात सगळ्यांची क्रश झालेली अभिनेत्री तृप्ती दिमरीला (Tripti Dimari) आता आणखी एक मोठा चित्रपट मिळाला आहे .अॅनिमल चित्रपटात अभिनेता रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapor) रोमान्स केल्यानंतर आता तृप्ती आणखी कार्तिक (Kartik Aryan) आर्यनोसोबत आगामी आशाकी 3 (Aashiqui 3 )मध्ये रोमान्स करताना दिसणार आहे.
[read_also content=”प्रभासच्या सालारची बॅाक्स ऑफिसवर धुमाकूळ, पाचव्या दिवशी कमावले 23.50 कोटी! https://www.navarashtra.com/movies/salaar-box-office-collection-day-6-is-23-50-crore-nrps-492612.html”]
अभिनेत्री तृप्तीने यापुर्वी वेबसिरिजमध्ये काम केलं आहे तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पंसतही केलं. ‘लैला मजनू’, ‘बुलबुल’ आणि ‘काला’ यांसारख्या चित्रपटांतून समीक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र, अॅनिमल चित्रपटात अभिनेत रणबीर कपूरसोबत काम केल्यानंतर प्रेक्षकांनी तिच्या कामाची दखल घेतली. ‘अॅनिमल’मध्ये पाहिलं तेव्हा त्यांना तिच्याबद्दल वेड लागलं. यामुळे सोशल मीडियावर तृप्तीची नवीन फॅन फॉलोइंग तयार झाली आहे. आणि आता तिला ‘नॅशनल क्रश’ घोषित करण्यात आले आहे.
बॉलिवूडच्या सुपर पॉप्युलर रोमँटिक फ्रँचायझी ‘आशिकी’च्या सिक्वेलवर काम सुरू झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. कार्तिक आर्यनला ‘आशिकी 3’ मध्ये मुख्य भूमिकेसाठी साइन केले आहे आणि अनुराग बसू त्याचे दिग्दर्शन करणार आहेत. पण कार्तिकसोबत या चित्रपटात हिरोईनची भूमिका कोणाला दिली जाणार यावर सस्पेंस होता.
आता या संदर्भात माहिती समोर येत आहे की, निर्मात्यांनी ‘आशिकी 3’ मधील लीड लीडसाठी तृप्ती डिमरीला फायनल केलं आहे. निर्मात्यांना वाटते की ती कार्तिक आर्यनसोबत पुन्हा एकदा पडदा गाजवणार. याची चर्चा
‘आशिकी 3’ लवकरच सुरू होत आहे
माहितीनुसार, अनुराग बसूचा ‘आशिकी 3’ 2024 च्या पहिल्या तिमाहीत येण्याची शक्यता आहे. कार्तिक आणि तृप्ती पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. ‘आशिकी 3’ व्यतिरिक्त, कार्तिक आणखी एका फ्रेंचाइजी ‘भूल भुलैया 3’ वर काम करत आहे, जो दिवाळी 2024 ला रिलीज होणार आहे.