अजय देवगण (Ajay Devgn) आणि आर माधवन (R Madhavan) यांची मुख्य भुमिका असलेला ‘शैतान’ (Shaitaan) बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट महिला दिनानिमित्त (8 मार्च 2024) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला, जो या वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. थिएटरमध्ये प्रेक्षकांच मनोरंजन केल्यानंतर ‘शैतान’ आता ओटीटीवरही प्रेक्षकांच मनोरंजन करण्याच्या तयारीत आहे. ‘शैतान’ कधी आणि कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येईल हे जाणून घ्या.
[read_also content=”लेकीला छातीशी धरून विमानतळावर दिसली प्रियंका; निकने पॅपराझींना पाहताच केला ‘हा’ इशारा, व्हिडिओ व्हायरल! https://www.navarashtra.com/movies/priyanka-chopra-holds-malti-nick-jonas-requests-paps-to-be-quiet-at-airport-nrps-519350.html”]
‘शैतान’ हा प्रदीप कृष्णमूर्ती दिग्दर्शित कृष्णदेव याज्ञिक यांच्या हिट गुजराती चित्रपट ‘वश’चा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील पात्रांचेही खूप कौतुक झालं. आर माधवनने रंगवलेला खलनायक प्रेक्षकांच्या चांगल्याच पंसतीस पडला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शैतान 3 मे 2024 रोजी OTT वर रिलीज होईल, ज्याचे हक्क नेटफ्लिक्सने आधीच खरेदी केले आहेत.
उल्लेखनीय आहे की, ‘शैतान’ जवळपास महिनाभर चित्रपटगृहात येऊन ठेपला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग केली आणि अजूनही चांगली कमाई करत आहे. रिपोर्टनुसार, तर ‘शैतान’ लवकरच जगभरात २०० कोटींचा आकडा पार करेल. सध्या ‘शैतान’ हा 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.