अक्षय कुमारने भाची सिमर भाटीयाचे केले कौतुक, म्हणाला, 'सिमर पुत्तर तू तेह...'
बॉलिवूडचा खिलाडी कुमार सध्या त्याच्या ‘स्काय फोर्स’ चित्रपटामुळे कमालीचा चर्चेत आहे. नववर्षाच्या मुहूर्तावर अभिनेत्याने चित्रपटाचा पोस्टर आणि मोशन पोस्टर शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. काल अभिनेत्याच्या ‘स्काय फोर्स’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची जबरदस्त उत्सुकता पाहायला मिळत आहे. कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारा अक्षय सध्या त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे. त्याच्या भाचीसाठी अभिनेत्याने खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पहिल्या पानाचा फोटो शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये अक्षयच्या भाचीचा फोटो दिसतोय. त्याची भाची ‘इक्किस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याचा उल्लेख केलेला आहे. श्रीराम राघवन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत, या चित्रपटामध्ये अगस्त्य नंदाही मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या बातम्या आहेत. ‘इक्किस’ चित्रपटाचे कथानक १९७१ च्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांचा बायोपिक असल्याच्या चर्चा आहेत.
अक्षय कुमारने फोटो शेअर करताना कॅप्शन दिले की, “मला आठवतंय की, मी पहिल्यांदा माझा फोटो वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर पाहिला होता. मला असं वाटतं की हा सर्वात मोठा आनंद आहे. आजही मला माहितीये की आपल्या मुलाचे फोटो न्यूजपेपरच्या पहिल्या पानावर पाहण्याचा आनंद कोणत्याही गोष्टीपेक्षा फार मोठा आहे. माझी आई आज इथे असती तर ती म्हणाली असती की, ‘सिमर पुत्तर तू तेह कमाल है’ म्हणायची. माझ्या बाळा खूप खूप आशीर्वाद… सर्व आकाश तुझे.” फोटो शेअर करताच चाहत्यांकडून अक्षय कुमारवर आणि सिमर भाटियावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.
पुष्कर जोग आणि पूजा राठोड ‘बायडी’ गाण्यात झळकणार, गाण्याचा धमाकेदार टीझर प्रदर्शित !
१९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धादरम्यान भारताने पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर केलेल्या हवाई हल्ल्यावर आधारित हा चित्रपट आहे. खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या ‘स्काय फोर्स’ चित्रपटाच्या २ मिनिट ४९ सेकंदाच्या ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. चित्रपटामध्ये अक्षय कुमारने आणि वीर पहारियाने भारताच्या हवाई दलातील अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. ‘स्काय फोर्स’ चित्रपटात प्रेक्षकांना एक रोमांचकारी कथा बघायला मिळणार आहे. ‘स्काय फोर्स’ चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि वीर पहारिया सोबतच सारा अली खान, निम्रत कौर आणि शरद केळकरही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
Bigg Boss 18 : करणवीरची पडझड सुरू, चाहतसोबत भांडण झाल्यावर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
‘स्त्री’ आणि ‘मुंज्या’ या हॉरर युनिव्हर्स चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या दिनेश विजन आणि मॅडॉक फिल्मसच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तर चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप केवलानी आणि अभिषेक अनिल कपूरने केलेलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन, ज्योती देशपांडे आणि अमर कौशिकने केली आहे. दिनेश विजन आणि मॅडॉक फिल्मस या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. दरम्यान, ‘स्काय फोर्स’ चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर शनिवार आणि रविवारी जगभरातल्या बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.